
वैजापूर । दिपक बरकसे
लोणी खुर्द ग्रामपंचायतीसमोर सोमवारी महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा (Handi Morcha protest) काढला. गावात तीव्र पाणीटंचाई असल्याने संतप्त महिलांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात हा मोर्चा आयोजित केला. (Loni Khurd water crisis)
ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, महिलांची पाण्यासाठी मोठी धावपळ होत आहे. मन्याड धरणात (Manyad Dam water supply) मुबलक पाणी उपलब्ध असतानाही गावाला पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
हे वाचलं का? – प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं, अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने काढला काटा

पंधरा ते वीस दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ग्रामपंचायतीकडे पंधराव्या वित्त आयोगातून तसेच कर वसूली, गाळे भाडे आणि आठवडी बाजाराच्या उत्पन्नातून लाखो रुपयांचा निधी असतानाही पाणी समस्येकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. (drinking water issues)
हे वाचलं का? – धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचारासाठी १०० रुपयांची सुपारी, हत्येचा ही होता प्लॅन पण…; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
प्रशासनाने तत्काळ पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी महिलांनी केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्येची दखल न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. (women protest for water in vaijapur)
प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



