लाडक्या बहिणींना महिला दिनाचं खास गिफ्ट, खात्यावर येणार ३००० रुपये

राज्य सरकारने महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी दिली आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा हफ्ता एकत्रित देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, ८ मार्च रोजी प्रत्येक लाभार्थीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले जातील. या प्रक्रियेला ५ मार्चपासून सुरुवात होईल आणि हफ्त्यांचे पैसे हळूहळू खात्यात येण्यास सुरुवात होईल.

महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देत सांगितले की, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना आर्थिक मदतीचा लाभ तातडीने मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता महिला दिनानिमित्त महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार आहे. मात्र अनेक अपात्र महिलांना यामधून वगळण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

हे वाचलं का? –  रात्रीच्या प्रवासातील ‘डेथ अवर्स’! अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

आदिती तटकरे काय म्हणाल्या?

८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त विशेष सत्र होणार आहे. महिला सभापतींसाठी हे विशेष सत्र आयोजित केले जाणार आहे. त्याचसोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ८ मार्चच्या पूर्वसंध्येला महिलांना देण्यात येईल. ५-७ तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे महिलांना ८ मार्च रोजी हे पैसे दिले जाणार आहे.

अडीच कोटी महिलांना हा हप्ता मिळणार आहे. मागच्या महिन्यात २ कोटी ३५ लाख महिलांना पैसे मिळाले आहेत. या महिन्यातही अडीच लाख महिलांना हप्ता मिळणार आहे. महायुतीचं सरकार सक्षम आहे. आम्ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने पुढे सक्षमरित्या कार्यरत ठेवणार आहे. फेब्रुवारीचा हप्ता ८ तारखेला येणार आहे. तर मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीत कधीही येऊ शकतो. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या हप्त्याची प्रक्रिया सुरु होईल, असंही त्यांनी सांगितलं.

हे वाचलं का? – राजकारणात मोठी उलथापालथ! ‘मविआ’ साफ, अनेक दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here