प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात अग्नितांडव, एकापाठोपाठ सिलिंडरचे तीन स्फोट!

प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यातून मोठी बातमी समोर आली आहे. महाकुंभमेळ्यामध्ये भीषण आग लागली. कुंभमेळ्यामध्ये असलेल्या तंबूंना भीषण आग लागली आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीचे लोट दूरहून दिसत आहेत. आगीमध्ये अनेक तंबू, साहित्य जळून खाक झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार कॅम्प साइटवर आग लागली आणि त्या भागात बसवलेल्या अनेक तंबूंना या आगीने वेढले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी NDRF चे एक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रमोद शर्मा म्हणाले, महाकुंभमध्ये सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागली आहे. तर, प्रयागराज झोनचे एडीजी भानू म्हणाले, महाकुंभमेळ्याच्या सेक्टर १९ मध्ये दोन-तीन सिलिंडरचा स्फोट झला. त्यामुळे कॅम्पमध्ये मोठी आग लागली. आगीवर नियंत्रण मिळण्यात आले आहे. सर्व लोक सुरक्षित आहेत आणि कोणीही जखमी झालेले नाही.

हे वाचलं का? – भरधाव पिकअपने शाळकरी मुलीला उडविले, मुलीचा जागीच मृत्यू… घटना CCTV मध्ये कैद

या आगीच्या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. सेक्टर ५ मध्ये सुरू झालेली आग हळूहळू सेक्टर १९ आणि २० मध्येही पसरत आहे. जोरदार वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली आणि आजूबाजूच्या तंबूंनाही वेढलं.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. प्रशासनाने आवाहन केले आहे की काळजी करण्यासारखे काही नाही. अफवांकडे लक्ष देऊ नका असं आवाहनही करण्यात आले आहे. मात्र, आग कशी लागली आणि तिने इतके भयानक रूप कसं धारण केले हे प्रशासनाने स्पष्ट केलं नाही.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी क्लीक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here