राज्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना बीड जिल्ह्यात आज पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. पोलीस भरती सराव आणि व्यायाम करण्यासाठी गेलेल्या तरुणांना भरधाव एसटी बसने चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे घोडका राजुरी गावावर शोककळा पसरली आहे.

ओम सुग्रीव घोडके (वय १९ वर्षे), विराट बब्रुवान घोडके वय (वय १८ वर्ष), सुबोध बाबासाहेब मोरे (वय १९ वर्ष) असे अपघातात मृत पावलेल्या तिघांची नावे आहेत. तिघेही तिन्ही जण घोडके राजुरी गावचे रहिवासी होते. आदित्य लक्ष्मण घोडके आणि निखिल बळीराम डरपे हे दोन तरुण अपघातातून थोडक्यात बसवले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हे वाचलं का? – चिमुकल्या पुतणीसाठी ९ महिन्यांची गर्भवती बिबट्याला भिडली! वैजापूरच्या आधुनिक हिरकणी पल्लवीताईंची गोष्ट

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सुमारे सहा वाजता हे पाच तरुण पोलीस भरतीच्या तयारीसाठी व्यायामासाठी गेले होते. घोडका राजुरी फाट्यावर रस्त्याच्या कडेला धावत असताना भरधाव वेगाने आलेल्या एसटी बसने पाचही तरुणांना उडवले. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे सुदैवाने बचावले. या दुर्दैवी अपघाताने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस होण्याचं स्वप्न बाळगून सकाळी सराव करणाऱ्या तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

हे वाचलं का? – भरधाव पिकअपने शाळकरी मुलीला उडविले, मुलीचा जागीच मृत्यू… घटना CCTV मध्ये कैद

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अपघाताचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. कधी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तर कधी रस्त्यावरील खड्डे, वाहनांचे विचित्र अपघात अशा अनेक कारणांमुळे होणारे अपघात वाढले आहेत. महामार्ग वाहतूक पोलीसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत राज्यात विविध कारणांनी होणाऱ्या अपघातांची संख्या ३२,८०१ एवढी आहे. यात १३,८२३ जण जागीच दगावले आहेत.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी क्लीक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here