
वैजापूर । दिपक बरकसे
औरंगजेबाच्या कबरीवरून (Aurangzeb tomb controversy) राज्यातील वातावरण तापले असून, ती हटवण्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांकडून औरंगजेबाची कबर हटवण्याची जोरदार मागणी केली जात आहे. यासाठी विविध ठिकाणी आंदोलनेही केली जात आहेत.
या आंदोलनाला आता महंत रामगिरी महाराज (Mahant Ramgiri Maharaj) यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. “औरंगजेबाची कबर यापूर्वीच हटवायला हवी होती,” असे ठाम मत त्यांनी मांडले आहे. तसेच, “इतिहास पाहता, अशा क्रूर शासकाची कबर भारतात का ठेवली जाते?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. (Maharashtra news)
हे वाचलं का? – उपविभागीय कार्यालयाच्या दारातच तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; वैजापूरातील धक्कादायक घटना
रामगिरी महाराजांनी औरंगजेबाला क्रूर शासक म्हणून संबोधले असून, “त्याने अनेक मंदिरे पाडून मशिदी बांधल्या. कुंभमेळ्यावर हल्ला केला, तसेच संभाजी महाराजांना धर्मांतरासाठी अमानुष यातना दिल्या. त्यामुळे अशा व्यक्तीची कबर ठेवण्याचा काहीही उपयोग नाही,” असे ते म्हणाले. “सध्या जे आंदोलन सुरू आहे, त्याला आमचे संपूर्ण समर्थन आहे,” असेही रामगिरी महाराज म्हणाले. (Aurangzeb history)
हे वाचलं का? – वैजापूर नगरपालिकेतील ‘नोकर’ झाले ‘राजे’! गलथान कारभाराने शहराची दुरवस्था, नागरिकांना फक्त शब्दांचे खेळ
नागपूर येथे झालेल्या दंगली बाबत (Nagpur violence) देखील रामगिरी महाराजांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दंगल करणारे हे औरंगजेबाच्या विचाराचे आहेत, ही दंगल पूर्वनियोजित असून तेथे दगड जमा करून दगडफेक करण्यात आली आहे. सध्या अराजकता पसरवली जात आहे याच कारण मुस्लिम धर्मियातले काही धर्म गुरू हे लहान पानापासून मुलांना भडकवण्याच काम करतात असेही वक्तव्य महंत रामगिरी महाराजांनी केले आहे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


