Horoscope Today | Representative Image

आज गुरुवार (१३ मार्च २०२५). आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या, आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य.

मेष (Aries)

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक ठरेल. दूरच्या प्रवासाचा योग येईल, परंतु जास्त धाडस करू नका. व्यावसायिक प्रगतीचे दार उघडेल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. कामात चंचलता आड आणू नका.

वृषभ (Taurus)

व्यावसायिक बदलाचे वारे मनात वाहू लागतील. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. तब्बेतीच्या तक्रारी कमी होतील. जोडीदाराचे कौतुक केले जाईल.

मिथुन (Gemini)

मनातील आकांक्षा विनासायास पूर्ण होतील. तरुण वर्गाने कसलीही घाई करू नये. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी. जोडीदाराविषयी मतभेद संभवतात.

कर्क (Cancer)

महत्त्वाच्या कागदपत्रांची काळजी घ्यावी. वरिष्ठांना नाराज करू नका. धार्मिक कार्याचा लाभ घ्यावा. भावंडांची काळजी लागून राहील. कलाकारांना प्रसिद्धी मिळेल.

सिंह (Leo)

तुमचा मनमोकळा स्वभाव इतरांच्या नजरेत भरेल. वरिष्ठांच्या शाबासकीस पात्र व्हावे. प्रेमप्रकरणातील जवळीक त्रासदायक ठरू शकते. कौटुंबिक स्वास्थ्य जपावे. जवळचा प्रवास घडेल.

कन्या (Virgo)

मुलांचा व्रात्यपणा वाढू शकतो. कामात चिकाटी ठेवावी लागेल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जुन्या कामातून लाभ संभवतो. अति अपेक्षा बाळगू नका.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

तुळ (Libra)

हाती सोपवलेले काम वेळेत तडीस न्याल. कामात कसलीही घाई उपयोगाची नाही. डोके ठिकाणावर ठेवून वागावे. कौटुंबिक बाजू ध्यानात घेऊन वागावे. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.

वृश्चिक (Scorpio)

जोडीदाराशी अनबन टाळावी. स्वकष्टाने आर्थिक बाजू सुधाराल. आपल्या वागण्याने कोणी दुखवणार नाही याची काळजी घ्यावी. सत्य-असत्याची खातरजमा करावी. फसवणुकीपासून सावध राहावे.

धनु (Sagittarius)

बाह्यरुपावर भुलू नका. काटकसरीचा मार्ग अवलंबाल. नवीन आव्हानाला सामोरे जाल. तुमची काम करण्याची शक्ति वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल.

मकर (Capricorn)

सर्वांशी मधुर वाणीने बोलाल. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. तुमच्या संभाषणाची उत्तम छाप पडेल. कामात अधिक उत्साह येईल. तुमची महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल.

कुंभ (Aquarius)

मनमोकळ्या गप्पा मारता येतील. तुमच्या संभाषण कौशल्यावर सर्व खुश होतील. व्यावहारिक चातुर्य दाखवून द्याल. कौटुंबिक जबाबदारी पेलाल. हातातील कला जोपासावी.

मीन (Pisces)

वेळेचे महत्व जाणून वागावे. कोणालाही शब्द देतांना विचार करावा. व्यावसायिक लाभाचे योग्य नियोजन करावे. चटपटीत पदार्थ खाल. आवडी-निवडी बाबत दक्ष राहाल.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल Headlines Marathi कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here