झगडा फाटा येथून दुचाकी चोरी; वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

वैजापूर । दिपक बरकसे

झगडा फाटा येथे अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्याची घटना (Bike theft Zhagda Phata) २९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणात अज्ञात चोरट्या विरोधात वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी पांडुरंग पुंडलीक पठारे (वय २७, रा. चंद्रपाल नगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची दुचाकी (क्रमांक MH 20 HE 2415) झगडा फाटा येथे हॅण्डललॉक करून उभी केली होती. मात्र, अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी लंपास केली. (two-wheeler stolen)

हे वाचलं का? – धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचारासाठी १०० रुपयांची सुपारी, हत्येचा ही होता प्लॅन पण…; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार

चोरी झालेल्या दुचाकीची (stolen vehicle alert) किंमत अंदाजे ३०,००० रुपये असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वैजापूर पोलीस करीत आहेत. (local crime update)

या चोरीप्रकरणी वैजापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी आपल्या वाहनांची विशेषतः सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. (vehicle theft news)

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here