
वैजापूर । दिपक बरकसे
दुचाकीसमोर अचानक घोडा आडवा आल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. वैजापूर तालुक्यातील घायगाव शिवारात हा अपघात झाला. (Vaijapur accident news)
मिळालेल्या माहितीनुसार, कौटगाव येथील रहिवासी राजेंद्र अण्णा मोरे (वय ३२) आणि गणेश दगू गायकवाड (वय ३७ रा. जातेगाव) हे दुचाकीने गंगापूर रोडने प्रवास करत होते. घायगाव शिवारात अचानक त्यांच्या दुचाकीसमोर घोडा आडवा आला (horse collision). दुचाकी घोड्याला धडकल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. (bike accident today)
हे वाचलं का? – शिर्डी हादरली! साई संस्थानाच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या, एक जखमी
अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर राजेंद्र मोरे यांना अधिक उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान ३ फेब्रुवारी पहाटे तीनच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. (Vaijapur News)
या घटनेची नोंद वैजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल किसन गवळी अधिक तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (latest accident news)
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


