"मोफत अन्नछत्र, मोफत शिर्डी करून ठेवलीय, त्यामुळे…"; डबल मर्डरवर सुजय विखेंचा संताप

शिर्डीत आज पहाटे झालेल्या भीषण हत्याकांडात (Shirdi Murder Case) साईबाबा संस्थानच्या (Sai Baba Sansthan) दोन कर्मचाऱ्यांचा बळी गेला तर अत्यवस्थ असलेल्या एका ग्रामस्थावर प्रवरानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेतील मयत झालेले सुभाष घोडे हे मंदिरातील कर्मचारी ड्युटीवर येत होते, तर नितीन शेजुळ हे सुरक्षा कर्मचारी ड्युटी संपवून घरी निघाले होते. कृष्णा देहरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते. त्यांच्यावरही प्राणघातक हल्ला झाला. पहाटे चार ते साडेपाच दरम्यान शिर्डीत विविध ठिकाणी या घटना घडल्या. मोटार सायकलवर असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशाने या तिघांना अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली. (Shirdi Crime News)

इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या तिघांवर चाकूने असंख्य वार केले. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. पोलिसांनी अपघात असल्याचे सांगून घटना गांभीर्याने न घेतल्याने मृतांचे नातेवाईक व नागरिकांनी संताप व्यक्त केला. घोडे यांच्या नातेवाईकांनी आरोपींना जोवर अटक होत नाही तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली आहे. या घटनांमुळे शिर्डीत तणावपूर्ण शांतता आहे. (Shirdi Violence)

हे वाचलं का? – धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचारासाठी १०० रुपयांची सुपारी, हत्येचा ही होता प्लॅन पण…; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार

दरम्यान या घटनेनंतर भाजप नेते आणि माजी खासदार सुजय विखे Sujay Vikhe Patil) यांनी शिर्डीतील मोफत अन्नछत्र बंद करण्याची मागणी केली आहे. सुजय विखे पाटील म्हणाले की, सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास शिर्डी संस्थानच्या २ कर्मचाऱ्यांनी निघृण हत्या करण्यात आली. खरेतर अशी घटना काही पहिल्यांदाच घटना घडली नाही. ही अचानक झालेली एक निघृण हत्या आहे. पहाटे ४-५ च्या सुमारास ही घटना घडली तेव्हा सर्वजण झोपेत होते. त्यामुळे हत्येचा निरोप येता-येता ६-७ वाजले. दोन मृतदेह वेगवगळ्या स्पॉटवर आढळले. एका जखमीवर प्रवरा मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. तो धोक्याबाहेर येईल अशी अपेक्षा आहे. माझे डॉक्टरांशी अजून बोलणे झाले नाही.

मोफत अन्नछत्र व मोफत शिर्डी करून ठेवण्यात आली आहे. (Shirdi Free Meal Scheme) यामुळे शिर्डीत गुन्हेगारी वाढली आहे. मी जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो हे महाराष्ट्राच्या लक्षात येईल. हे प्लान्ड मर्डर वाटत नाहीत. हे नशेमध्ये होणारे रँडम मर्डर आहेत. यावर राजकारण करण्याची गरज नाही. पण जे घडले ते अत्यंत दुर्दैवी आहे. हे हत्याकांड व्हाईटनरची नशा करणाऱ्या मुलांनी केले असावे. वेगवेगळ्या ठिकाणी जो सापडेल, त्याच्यावर हल्ला करून पैसे काढण्याचा हा प्रकार आहे. असंही सुजय विखे पाटील म्हणाले.

यात जातीपातीचा विषय नाही. हे नशेखोरांचे कृत्य आहे. पोलिस हल्लेखोरांच्या लवकरच मुसक्या आवळतील पोलिसांना या घटनेची पहाटे साडेपाचच्या सुमारास माहिती देण्यात आली. त्या कर्मचाऱ्याने हा अपघात असल्याचा दावा केला. त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल. त्याला मर्डर व अपघातामधील फरक कळला नाही. त्यामुळे त्याला पोलिस ठाण्यात राहण्याचा अधिकार नाही, असेही सुजय विखे यावेळी बोलताना म्हणाले.

प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here