
संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी भारतीय अवकाश संशोधनाच्या शास्त्रज्ञांनी करुन दाखवली आहे. अवकाशाला गवसणी घालत भारताने नवी उंची गाठली आहे. (ISRO 100th Mission)
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) ने सकाळी 6.33 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून NVS-02 वाहून नेणारे GSLV-F15 यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित केले. देशाच्या अंतराळ केंद्रातून इस्रोचे हे 100 वे प्रक्षेपण आहे. इस्रोचे हे अभियान यशस्वी झाले आहे. मिशन यशस्वी झाल्याचे इस्रोने या मोहिमेबद्दल सांगितले आहे. अंतराळ नेव्हिगेशनमध्ये भारताने नवी उंची गाठली आहे.
हे वाचलं का? – महाकुंभात चेंगराचेंगरी! अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, गंभीर जखमींची संख्याही जास्तच… मध्यरात्री प्रयागराजमध्ये काय घडलं?
अमेरिकेच्या GPS प्रमाणे भारतीय उपखंडात स्वदेशी दिशादर्शक प्रणाली किंवा व्यवस्था कार्यरत व्हावी यासाठी 2011 पासून इस्रोने NavIC ( Navigation with Indian Constellation) नावाने सात उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. या उपग्रहांमुळे लष्कराच्या विविध विभागांना आणि नागरी विमान सेवेकरता GPS प्रमाणे दिशादर्शन हे भारतीय उपखंडात केले जाते. याच उपग्रहांच्या प्रणालीत आता NVS-02 हा नवीन उपग्रह 2016 ला पाठवलेल्या IRNSS-1E या उपग्रहाची जागा घेईल. (space technology India)
हे वाचलं का? – सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू! अंगभर कपडे घालून आला तरच प्रवेश, न्यासचा नेमका निर्णय काय?
इस्त्रोने ही अंतराळ मोहीम हाती का घेतली याविषयी जनतेत उत्सुकता आहे. GSLV-F15 हा भारतीय उपखंडातील आणि देशाच्या भूभागातील 1,500 किलोमीटर पट्ट्यातील वापरकर्त्यांना अचूक स्थिती, वेग आणि वेळेची महिती मिळेल. सोमवारी रात्री 2:53 वाजता या मोहिमेची गणिती सुरू झाली होती. सकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.
10 ऑगस्ट 1979 ला श्रीहरीकोटा या तळावरुन इस्रोच्या रॉकेटने पहिले उड्डाण केले. त्यावेळी Rohini Technology Payload हा उपग्रह प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते उड्डाण अयशस्वी ठरले असले तरी श्रीहरीकोटावरुन उपग्रह प्रक्षेपणाचा श्रीगणेशा करण्यात आला. त्या मोहिमेचे नेतृत्व हे डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी केले होते. मात्र त्यानंतर अपयशाने खचून न जाता 18 जुलै 1980 ला याच तळावरुन भारताने अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर पहिला उपग्रह प्रक्षेपित केला. आजच्या १०० व्या उड्डाणासह इस्रोने या श्रीहरीकोटाहून आत्तापर्यंत एकुण 548 उपग्रह प्रक्षेपित केले असून यामध्ये 443 विदेशातील उपग्रहांचा समावेश आहे. याच तळावरुन आत्तापर्यंच चांद्रयान, मंगळयानसारख्या मोहिमा प्रक्षेपित केल्या आहेत. लवकरच समानवी मोहिमाही याच तळावरुन प्रक्षेपित केली जाणार आहे.


