
रागाच्या भरात माणूस कुठल्या स्तरावर जाऊ शकतो, हे काही सांगता येत नाही. आजकाल लहान लहान मुलांची मानसिकता देखील स्वैराचाराच्या विरुद्ध जाताना दिसते. अशातच एक धक्कादायक प्रकरण आता पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून समोर आलं आहे. (Pune crime news)
एका अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार करण्यासाठी चक्क १०० रुपयांची सुपारी दिली होती. अत्याचाराबरोबर तिची हत्याही १०० रुपयात करायची होती. विशेष म्हणजे ही सुपारी त्या विद्यार्थ्याने आपल्याच शाळेतील दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला दिली होती. सर्वात भयंकर म्हणते असं कृत्य करण्यामागचे कारण ऐकून तुम्ही ही थक्क व्हाल. (Daund school crime)
हे वाचलं का? – सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू! अंगभर कपडे घालून आला तरच प्रवेश, न्यासचा नेमका निर्णय काय?
पोलिसांच्या माहितीनुसार, दौंड परिसरात असणाऱ्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एका विद्यार्थ्याने आपल्या पालकांची खोटी स्वाक्षरी केली. या गोष्टीची माहिती एका विद्यार्थीनीने शिक्षकांना दिली. त्यामुळे खोट्या सहीची माहिती शिक्षकांना दिल्याचा राग विद्यार्थ्यांच्या मनात होता. त्यामुळे त्याने त्या विद्यार्थिनीवर आधी अत्याचार करावा आणि नंतर तिचा खून (student murder plot) करावा यासाठी १०० रुपयांची सुपारी दुसऱ्या वर्गातील अल्पवयीन मुलाला दिली. (teacher negligence)
हा सर्व प्रकार संबंधित विद्यार्थ्याने त्या विद्यार्थीनीला सांगितला. त्यानंत्तर तिने हा प्रकार घरच्यांना सांगितला, घरच्यांनी याबाबत शाळा प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीसह तिच्या पालकांनी दौंड पोलीस ठाणे गाठले. यानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मानसिक त्रास देत तिचे शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणातील मुलास बाल न्याय मंडळासमोर लवकरच हजर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (student violence in schools)
हे वाचलं का? – अस्मानीसह सुलतानी संकट! तणनाशक फवारणीमुळं १०० एकरावरचा कांदा नष्ट, नाशिक जिल्ह्यातील प्रकार
शाळेनेही हा याप्रकरणात टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. जर का सुपारी बाबत त्या विद्यार्थ्यानेही गंभीर पाऊल उचलले असते तर त्या अल्पवयीन मुलीला आपला जीव ही गमवावा लागला असता. वेळीच त्याने त्या मुलीला सावध केले. शिवाय त्यामुलीनेही आपल्या पालकांना तातडीने याची माहिती दिली. त्याच वेळी शाळा प्रशासनाने संबधीत विद्यार्थ्यावर कारवाई करणे गरजेचे होते. मात्र पुण्यात अलिकडच्या काळात अशा घटना घडताना दिसत आहेत. या घटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत.
प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


