वैजापूर तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर

वैजापूर । दिपक बरकसे

तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी मोबीन खान,उपाध्यक्षपदी प्रवीण पाटील व सचिवपदी नितीन थोरात यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

पत्रकार दिनानिमित्त येथील पंचायत समितीच्या विनायकराव पाटील सभागृहात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. याच कार्यक्रमात वैजापूर तालूका पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. पदाधिकारी निवडीनंतर सत्कार करण्यात आला. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन चारित्र्यवर पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले.

हे वाचलं का? – भ्रष्टाचार उघड करणं तरूण पत्रकाराच्या जीवावर बेतलं, सेप्टिक टँकमध्ये सापडला मृतदेह

पत्रकार संघाची अन्य कार्यकारणी

सहसचिव – दीपक बरकसे, कोषाध्यक्ष-आवेज खान, सहकोषाध्यक्ष – राहुल त्रिभुवन, जिल्हा प्रतिनिधी – मन्सूर अली यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी विजय गायकवाड, फैसल पटेल, अमोल राजपूत, बाबासाहेब धुमाळ, काकासाहेब लव्हाळे, हरिभाऊ साबणे, सुयोग वाणी, निर्घोष त्रिभुवन यांची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी शहर आणि ग्रामीण परिसरातील सर्व पत्रकार उपस्थित होते.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here