
वैजापूर । दिपक बरकसे
राज्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच आता वैजापूरमधून (Vaijapur Crime News) आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत शेतीवरून झालेला वाद विकोपाला पोहोचला आणि एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल आहे. सुनील कडुबा वाघ,(वय 30, रा. चिंचडगाव तालुका वैजापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात मृत सुनील कडुबा वाघ याचे शेत आहे. सोमवारी रात्री मृत सुनील यांचे आरोपी विजय पुजाहरी वाघ व पोपट (भावड्या) लहानु वाघ यांच्यात वाद झाला. यात मृत सुनीलला दोघांनी काठीने बेदम मारहाण केली. यात सुनीलचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार (७ जानेवारी) रोजी रात्री घडली.
हे वाचलं का? – धक्कादायक! राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षणानं संपवलं जीवन, खिशात सापडली चिठ्ठी, शैक्षणिक क्षेत्रात खळबळ
हिम्मत नारायण भोसले (वय 45 रा भामाठाण ता. श्रीरामपूर) याच्या फिर्यादीवरून विरगाव पोलिस ठाण्यात विजय पुंजाहरी वाघ व पोपट (भावड्या) लहानु वाघ या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक शंकरराव वाघमोडे यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विरगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


