LPG Gas : नववर्षाच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या कमी!

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरची किंमत कमी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे हॉटेल तसेच इतर व्यावसायिकांना चांगलाच फायदा होणार आहे. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताच बदल झालेला नाही.

IOCL कंपनीच्या वेबसाइटवर नवीन दर अपडेट करण्यात आले आहेत. यानुसार राजधानी दिल्ली शहरात व्यावसायिक सिलिंडर आता १८०४ रुपयांना झाला आहे. कोलकाता शहरात व्यावसायिक सिलिंडरसाठी १९११ रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबईत व्यावसायिक सिलिंडर आजपासून १७५६ रुपयांना मिळणार आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नई शहरात १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी १९६६ रुपये द्यावे लागणार आहेत.

हे वाचलं का? – RBI चा मोठा निर्णय! आजपासून ‘ही’ बँक खाती बंद होणार

साधारण सहा महिन्यांनंतर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. याआधी गेल्या वर्षाच्या जुलै महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सलग वाढ करण्यात आली होती. या काळात दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात एकूण १७२.५ रुपयांची वाढ झाली होती.

दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणतेही बदल झालेले नाहीत. राजधानी दिल्लीत घरगुती सिलेंडरच्या जुन्या किंमतीत म्हणजेच ८९२.५० रुपयांनाच मिळणार आहे. तर, मुंबईत ८०२.५० रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती ८२९ रुपये आणि चेन्नईत ८१८.५० रुपये आहेत.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा हेडलाईन्स मराठीच्या व्हॉट्सॲप ग्रुप वर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here