शिंदे-फडणवीसांमध्ये नाराजीचा नवा अंक? शिंदेंच्या आमदारांची Y दर्जाची सुरक्षा काढली, आता केवळ...

राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असले तरी, युतीतील अंतर्गत वाद अद्यापही शांत झालेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आमदारांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरु आहे. या निर्णयामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

शिवसेना आमदारांना यापूर्वी वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती, मात्र आता ती कमी करण्यात आली आहे. तसेच, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. राज्य सरकारने अशा नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे, ज्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही. या निर्णयावरून शिंदे गटाच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी आहे.

पूर्वी शिंदे गटाच्या आमदारांसाठी विशेष पोलिस संरक्षण उपलब्ध होते. त्यामध्ये पोलिसांच्या गाड्या त्यांच्या सोबत असायच्या आणि घराबाहेरही सुरक्षा तैनात होती. मात्र, नव्या नियमानुसार, यामध्ये मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. आता आमदारांच्या मागे-पुढे पोलिस गाड्या असणार नाहीत आणि त्यांच्या सोबत केवळ एक सुरक्षारक्षक असेल.

हे वाचलं का? – शिवजयंतीसाठी झेंडे लावताना भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, ४ गंभीर

महायुती सरकारला तीन महिने पूर्ण होत आले असले तरी, मंत्रिपदांचे वाटप आणि पालकमंत्रिपदांवरून तणाव कायम आहे. या परिस्थितीत शिवसेना आमदारांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय शिंदे गटासाठी धक्का मानला जात आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान, मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर देखील सत्ता संघर्षाची छाया दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन केला असताना, त्याच कार्यालयाशेजारी एकनाथ शिंदे यांनीही असा कक्ष सुरू केला आहे. याच मजल्यावर फडणवीस यांची वॉर रूम आणि शिंदे यांची समन्वय समिती कार्यरत आहे. त्यामुळे या ठिकाणी सुरू असलेल्या सत्तासंघर्षाची चर्चा रंगू लागली आहे.

हे वाचलं का? – प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं, अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने काढला काटा

या घडामोडींवर उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी टोला लगावत महायुतीमध्ये व्हलेंटाईन सुरू नसल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीतील अंतर्गत वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here