साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना लुटले; तब्बल २ लाखांचा ऐवज लंपास

वैजापूर । दिपक बरकसे

टेंपो ट्रॅव्हलर अडवून कारमधून आलेल्या चौघांनी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या कर्नाटकातील भाविकांना चाकूचा धाक दाखवत सोने-चांदीचे दागिन्यांसह रोख दोन लाख एक हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना मुंबई-नागपूर महामार्गावरील भग्गाव-बेलगाव (ता. वैजापूर) भागात सोमवारी (ता. १७) पहाटे घडली. (Karnataka Devotees Robbery)

याप्रकरणी टेंपो ट्रॅव्हलर चालक मनीकंट हनुमंतअप्पा (रा. चित्रदुर्ग, कर्नाटक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैजापुर पोलिस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार, मनीकंट हनुमंत अप्पा यांची टेंपो ट्रॅव्हलर (क्रमांक केए ११ बी ४१०१) ही टेंपो ट्रॅव्हलर गाडी असुन या गाडीतुन ते देवदर्शनासाठी भाविकांची ने आण करतात. (Shirdi Pilgrims Mugged)

हे वाचलं का? – प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं, अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने काढला काटा

सात फेब्रुवारी रोजी बारा प्रवाशांना घेऊन ते देवदर्शनासाठी निघाले. ते रात्री ओंकारेश्वर येथुन शिर्डीला वैजापूर मार्गे जात असताना पहाटे पाच वाजेच्या सुमारास भग्गाव ते बेलगाव रस्त्यावर पाठीमागुन येणाऱ्या कारने हुलकावणी देऊन कार गाडीच्या समोर आडवी लावली. त्यानंतर कारमधील चौघांनी चालकाला दमदाटी करत गाडी थांबवली व प्रवाशांना चाकुचा धाक दाखवुन रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने बळजबरीने हिसकावुन घेतले व पोबारा केला. (Mumbai Nagpur Highway Crime)

या घटनेत के.एन. लोहित, विश्वनाथ बसन्ना, एन.सी. चंद्रशेखर, बमराज एन.सी., इश्वर अप्पा पुरी अप्पा, जयरत्न विश्व अप्पा, दिव्या एन.सी. चंद्रशेखर, जी.एम. जयमाला, के.एन. मंजुळा, सरोजा (सर्व राहणार विद्यानगर, चित्रदुर्ग, कर्नाटक) या प्रवाशांची लूट करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. (Shirdi Pilgrimage Safety)

प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here