अंजली दमानियांचे धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; थेट कागदपत्र दाखवले

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आधीच विरोधकांच्या निशाण्यावर असलेले राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.

एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे पैसे किती आणि कसे खातो, कायदे कसे पायदळी तुडवतो याचे पुरावे मी देणार आहे, असं म्हणत अंजली दमानिया यांनी थेट लाभ हस्तांतर योजनेतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी पोलखोल केली. या योजनेअंतर्गत सरकार जे पैसे देतं, त्या योजनांचा दुष्परिणाम होतोय, त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, म्हणून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, असा दावा करत अंजली दमानिया यांनी कृषी क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा लेखोजाखा मांडला आहे. धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यात घोटाळा केला असून त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

हे वाचलं का? – शिर्डी हादरली! साई संस्थानाच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या, एक जखमी

नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झालाय, असं म्हणत अंजली दमानिया यांनी या उत्पादनांची मूळ ऑनलाईन किंमत पत्रकारांना दाखवली अन् हे उत्पादन विकत घेण्यासाठी धनंजय मुंडेंनी वाढीव पैसे आकारल्याचं त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, हे उत्पादने इफको नावाच्या कंपनीचे आहेत. नॅनो एरियाचा १८४ पर लिटर दर आहे. म्हणजे ५०० मिलिलीटरच्या बॉटलला ९२ रुपये लागतात. पण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं. ती २२० रुपयात घेतली गेली. सिंगल बॉटल बाजारात ९२ रुपयाला मिळते. पण मुंडे यांनी १९ लाख ६८ हजार ४०८ बॉटल या २२० रुपयाने घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किंमतीने बॉटल घेतल्या, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

नॅनो डीएपीची किंमत ५२२ रुपये एक लिटर आहे. म्हणजे ५०० मिलिलीटरची बॉटल ही केवळ २६९ रुपयाला मिळते. एकूण बॉटल घेतल्या १९ लाख ५७ हजार ४३८ घेतल्या. त्याचा बाजार भाव २६९ रुपये, पण कृषी मंत्र्यांनी ५९० रुपयाला खरेदी केली आहे. हे दोन्ही घोटाळे ८८ कोटींचे आहेत, असा दावा अंजली दमानिया यांनी केला.

हे वाचलं का? – “मोफत अन्नछत्र, मोफत शिर्डी करून ठेवलीय, त्यामुळे…”; डबल मर्डरवर सुजय विखेंचा संताप

बॅटरी स्पेअर हा टु इन वन आहे. एमएआयडीच्या वेबसाईटवर हा स्पेअर मिळतो. तो २४५० रुपयाला मिळतो. एमएआयडीच्या वेबसाईटवर २९४६ रुपयाला विकला जातो. कृषी मंत्र्यांनी टेंडर काढलं. ३४२६ रुपयाला त्यांनी ही बॅटरी विकत घेतली. एक हजाराच्या वर एक एक बॅटरी स्पेअर कमावले”, असं म्हणत अंजली दमानिया म्हणाल्या, डीबीटी योजनेत ५ लाखांहून अधिक लाभार्थी होणार होते. यासाठी बजेट ठरलं होतं. पण उत्पादनांच्या किंमती जास्त दाखवून कमी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

गोगलगायीचा प्रादूर्भाव झाल्याने कापूस आणि सोयीबीनचं नुकसान होतं. मेटाल्डे हाइड हे पीआयए कंपनीचं पेटेंटेड उत्पादन आहे. हे उत्पादन बल्कमध्ये घेतल्यावर स्वस्त मिळतं. रिटेलमध्ये आता या उत्पादनाचं दर ८१७ रुपयाला आहे. पण कृषी मंत्री मुंडेंनी १२७५ रुपयाला विकत घेतलं. एकूण १ लाख ९६ हजार ४४१ किलो विकत घेतलं. कॉटन स्टोरेज बॅग ६ लाख १८ हजार घेतल्या. काही दिवसापूर्वी आयसीएआय नावाची संघटना आहे. त्यांनी २० बॅगा घेतल्या. ५७७ रुपयाला. पण मुंडेंनी टेंडरमधून १२५० रुपयाला घेतल्या. ३४२ कोटीच्या टेंडरमध्ये १६० कोटी रुपये सरळ सरळ गेले, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, मी ऑनलाइन उपलब्ध असलेले दर सांगतेय. हे दर रिटेलचे आहेत. पण ही उत्पादने बल्कने घेतली तर २० टक्के अधिक आहेत. इतके महान कृषी मंत्री आहेत. एकच वर्ष पदावर होते. एका वर्षात या व्यक्तीने अफाट पैसा खाल्ला असेल तर त्यांना मंत्रीपदावर ठेवण्याची गरज आहे का?” असा सवाल अंजली दमानिया यांनी केला. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्याच, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here