
चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स’ कंपनीच्या मुख्य सूत्रधाराला अहिल्यानगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. भूपेंद्र राजाराम सावळे (वय २७, रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला बुधवारी (१६ जुलै) राहाता येथील एम.पी.आय.डी. विशेष न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला २५ जुलैपर्यंत नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Bhupendra Sawale fraud case)
नंदुरबार कारागृहातून ताब्यात
भूपेंद्र सावळे हा नंदुरबार कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. शाहादा पोलिसांनी यापूर्वी त्याला एका गुन्ह्यात अटक केली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला नंदुरबार कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र, राहाता येथील गुन्ह्याच्या तपासासाठी अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी (१५ जुलै) सायंकाळी न्यायालयाच्या परवानगीने त्याला ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी त्याला राहाता न्यायालयात हजर केले. (Police custody investment fraud)
राज्यभरातील गुंतवणूकदारांचे करोडोंचे नुकसान
भूपेंद्र सावळे आणि त्याच्या साथीदारांनी राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढले. नाना पैसे दुप्पट करण्याचे स्वप्न दाखवून सामान्य लोकांना फसवणुकीचा बळी बनवले गेले. शिर्डी, राहाता, नाशिक आणि शाहादा (जि. नंदुरबार) येथील पोलीस ठाण्यांमध्ये भूपेंद्र आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. शिर्डी आणि राहाता येथील गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. (Investment fraud India)
हे वाचलं का? – मोठी बातमी! महिला कीर्तनकाराच्या हत्येचे गूढ उकलले; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात
राहाता येथील शितल गोरखनाथ पवार (वय ३३, रा. पैजनबाबाचा मळा) यांनी ४ जुलै रोजी राहाता पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून भूपेंद्र सावळे याच्यासह भाऊसाहेब आनंदराव थोरात, संदीप सावळे, सुबोध सावळे आणि राजाराम भटू सावळे (सर्व रा. शिर्डी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वांनी मिळून ‘ग्रो मोअर’ कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा आरोप आहे. (Maharashtra investment fraud)
करोडोंच्या गुंतवणुकीचा घोटाळा
शिर्डी आणि राहाता परिसरातील अनेक गुंतवणूकदारांनी भूपेंद्र सावळे याच्या आमिषाला बळी पडून ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स’ (Grow More Investment scam) कंपनीत करोडो रुपये गुंतवले. पोलिसांना संशय आहे की, सावळे याने ही रक्कम स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरली. तसेच, कंपनीच्या बँक खात्यांतून मोठ्या रकमा विविध संस्थांना वर्ग केल्या गेल्या आणि काही रक्कम रोखीने काढण्यात आली. या सर्व प्रकरणांचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी सावळेला दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने २५ जुलैपर्यंत नऊ दिवसांची कोठडी मंजूर केली. (Shirdi scam news)
गुंतवणूकदारांना आवाहन
या फसवणुकीत अनेक सामान्य गुंतवणूकदार भरडले गेले असून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये सावळे आणि त्याच्या कंपनीकडे जमा करण्यात आले आहेत. अजूनही अशा गुंतवणूकदारांची माहिती समोर येण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स’च्या नावावर कोणी परताव्याचे आमिष दाखवत असेल तर अशा कोणत्याही व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडू नये. यापूर्वी गुंतवणूक केलेल्या व्यक्तींनी आपली कागदपत्रे घेऊन नगर आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (Ponzi scheme Maharashtra)
हे वाचलं का? – धक्कादायक..! पाईपलाईनचा वाद ठरला जीवघेणा, दोन पुतण्यांनी घेतला चुलत्याचा जीव
आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहे. भूपेंद्र सावळे याने कंपनीच्या बँक खात्यांतून केलेल्या आर्थिक व्यवहारांचा तपशील तपासला जाणार आहे. तसेच, गुंतवणूकदारांच्या पैशांचा गैरवापर कसा झाला, याची माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घोटाळ्यामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले असून, पोलिसांना या प्रकरणात आणखी काही संशयितांचा शोध लागण्याची शक्यता आहे. (Investor scam alert India)
आर्थिक गुन्हे शाखेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा कंपनीच्या चांगल्या परताव्याच्या जाहिरातींवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची पडताळणी करावी. तसेच, फसवणुकीची शिकार झालेल्या गुंतवणूकदारांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत आणि सर्व दोषींना शिक्षा होईपर्यंत आर्थिक गुन्हे शाखा आपले काम सुरू ठेवणार आहे. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. (Headlines Marathi News)
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


