Walmik Karad : फरार वाल्मीक कराडची अखेर शरणागती; पुण्यात CID समोर हजर

0
422

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आता पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या नऊ टीम कार्यरत आहेत. टीममध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडीचे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व टीमने सुमारे १०० हून अधिक लोकांची या प्रकरणांमध्ये आतापर्यंत चौकशी केली आहे. वाल्मिक कराडवर सीआयडीने आपला दबाव वाढवण्यास सुरुवात केली होती.

त्यानंतर आज सकाळपासूनच पुण्यातील सीआयडीच्या मुख्य कार्यालयाबाहेर हालचालींना वेग आला होता. परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यातून धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड समर्थकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. वाल्मिक कराडांविरोधात खोटे आणि चुकीचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा कराड समर्थकांनी केला होता. त्यामुळे येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here