
वैजापूर । दिपक बरकसे
वैजापूर तालुक्यातील लाखगंगा येथे २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. बापूसाहेब सूर्यकांत चांदगुडे असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हे वाचलं का? – भरधाव पिकअपने शाळकरी मुलीला उडविले, मुलीचा जागीच मृत्यू… घटना CCTV मध्ये कैद
मिळालेल्या माहितीनुसार, बापूसाहेब चांदगुडे हा वैजापूर तालुक्यातील लाखगंगा येथील रहिवासी होता. बुधवारी सकाळी त्याने राहत्या घरी गळफास घेतल्याचे दिसून आले. कुटुंबीयांनी तातडीने त्याला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
हे वाचलं का? – शेतीच्या बांधावरून वाद विकोपाला, मारहाणीत तरुणाचा जीव गेला
या घटनेची नोंद विरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक भालेराव यांच्या नेतृत्वाखाली प्रकरणाचा तपास सुरू आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



