
वैजापूर तालुक्यातील तिडी शिवारात दुचाकी आणि ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली.
अपघातात संभाजी शिवाजी बनसोडे (वय ५०, रा. शहादतपूर, तालुका वैजापूर) यांचा मृत्यू झाला तर शिवाजी पांडुरंग जाधव (वय ४० , रा. शहादतपूर) ए गंभीर जखमी झाले आहे.
हे वाचलं का? – अल्पवयीन गतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार, इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून फेकून देत हत्या
प्राथमिक माहितीनुसार, दोघेही दुचाकीवरून प्रवास करत असताना ट्रॅक्टरला धडक लागल्याने हा अपघात घडला. दोघांनाही गंभीर मार लागल्यामुळे स्थानिकांनी तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संभाजी बनसोडे यांना मृत घोषित केले. तर, गंभीर जखमी असलेल्या शिवाजी जाधव यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. या घटनेची नोंद वैजापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



