
वैजापूर । दिपक बरकसे
वैजापूरमध्ये आज (दि.२१) सकाळी टेंभी नाका उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. या प्रसंगी आमदार प्रा. रमेश बोरनारे सर, जिल्हा उपप्रमुख बाबासाहेब जगताप, संजय बोरनारे, रणजित चव्हाण, शहर प्रमुख पारस घाटे, दशरथ बनकर, श्रीराम गायकवाड, रामेश्वर जाधव आणि डॉ. प्रकाश शेळके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी टेंभी नाका प्रतिष्ठानचे सदस्य अँड. देवदत्त पवार, गणेश पवार, अमोल बोरनारे, प्रेम राजपूत, अनील मामा सोनवणे, अँड. संदीप डोंगरे, शेखर मगर, ज्ञानेश्वर सोमाशे, रामेश्वर जाधव, सुनील पवार, विक्रम कदम, अमोल जाधव, गौरव जगताप, योगेश बोर्डे, अंकूश तुपे, गफार शेख, सुमित ठोंबरे, राजू जाधव, योगेश भालेराव, सागर भालेराव, विशाल ठोंबरे, पंकज मत्सगर, पंकज साळुंके, श्रीकांत पाटील, प्रशांत शिंदे, सुकृत पाटील, ऋषी पवार, संदीप जगताप, अभिजित अव्हाले, आक्षय मालोदे, सागर भालेराव आणि शाहीद कुरेशी यांची उपस्थिती होती. उद्घाटन सोहळ्यादरम्यान प्रतिष्ठानच्या सदस्यांनी एकत्रित येत या प्रकल्पाचा उद्देश आणि भविष्यातील विकासकामांबाबत चर्चा केली.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



