वैजापूर । दिपक बरकसे

एमआयटी पॉलिटेक्निक कॉलेज, रोटेगाव येथे असलेल्या असुविधा तसेच संस्थेच्या जागे संदर्भात केतन दिगंबर आव्हाळे यांनी उपसचिव दंडगव्हाळ (महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ प्रादेशिक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर) तक्रार केली होती. त्या अनुषंगाने दंडगव्हाळ यांनी चौकशी समिती गठीत केली होती.

या चौकशी समितीचे अध्यक्ष व्ही.डी.नितनवरे (प्राचार्य पु.ला.शासकीय तंत्रनिकेतन लातूर) यांची तर पराग एम पाटील (प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन जळगाव), के.बी.लढाने (विभाग प्रमुख स्थापत्य अभियांत्रिकी, शासकीय तंत्रनिकेतन नाशिक), आर.टी.आघाव (अधि.उपयोजित यंत्रशास्त्र, शासकीय तंत्रनिकेतन छत्रपती संभाजीनगर), सुजाता द जगताप (अधि.अणुविद्युत अभियांत्रिकी,शासकीय तंत्रनिकेतन छत्रपती संभाजीनगर) हे सर्व सदस्य आहेत. देवेंद्र र दंडगव्हाळ (उपसचिव प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजीनगर) यांची सदस्य सचिव म्हणून समितीमध्ये उपस्थित होते. या सर्वांनी केतन आव्हाळे यांना सर्वप्रथम आपल्या तक्रारी बाबत काय मत आहे त्याचे विचारणा केली.

त्यानुसार आव्हाळे यांनी संबंधित संस्थेमध्ये २०२३ ते डिसेंबर २०२४ पर्यंत संगणक शाखेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ए.आय.सी.टी.ई.च्या नुसार शिक्षक वर्ग नाही. तसेच त्यांचे शिक्षण देखील त्या नियमानुसार नाही याची तक्रार मागील एक वर्षापासून करत आलो आहे. परंतु आजपर्यंत याची दखल घेतली नसल्याचे समितीच्या निदर्शनास आणून दिले, तसेच २०२४ मध्ये झालेली चौकशी वगळता इतर चौकशी समिती यांनी संस्थेला वाचवण्यासाठी व आपले जे काही संस्थेसोबत हितसंबंध टिकवायचे आहे. त्या अनुषंगाने संस्थेच्या बाजूने चौकशी अहवाल दिल्याचा आरोप केला.

हे वाचलं का? – नाशिकमध्ये मध्यरात्री थरार! लाखो रुपयांचा गांजा जप्त, पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई… Video समोर

विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक वर्ग नाही व जे काही शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत होते. त्यामधले काही शिक्षकांची शैक्षणिक अहर्ता ही ए.आय.सी.टी.ई.च्या नियमानुसार नसून ते विद्यार्थ्यांना शिकवत होते. हे देखील वारंवार आव्हाळे यांनी तक्रार करून वरिष्ठ कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. परंतु वरिष्ठ कार्यालयाने याची देखील दखल घेतली नाही, तसेच संबंधित संस्थेमध्ये ॲग्रीकल्चर या शाखेचे देखील लॅब व विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसा शिक्षक वर्ग देखील नाही हे देखील निदर्शनास आणून दिले.

तसेच संबंधित संस्थेने दोन दिवसापूर्वी वैजापूर येथील मुरारी पार्क येथून एका दुकानदाराकडून जवळपास संगणक नवीन खरेदी करून आव्हाळे यांनी आमच्या संस्थेत असुविधा आहे असी जी तक्रार केली आहे ते खोटे ठरवण्याचा प्रयत्न संबंधित संस्थेचे प्राचार्य यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे हे देखील आव्हाळे यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच संबंधित संस्थेची जागा ही रेड झोन असून ती अ-कृषिक (NA) केलेली नाही. तसेच ती जागा नगररचना विभाग छत्रपती संभाजीनगर कार्यालयाकडून सन २०१६ मध्ये रेड झोन म्हणजेच शैक्षणिक संस्थेसाठी राखीव करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांनी भोगवटाधारकचे प्रमाणपत्र जोडून संबंधित जागा शैक्षणिक संस्थेसाठी राखीव केली. ते भोगवटाधारक प्रमाणपत्र कोणत्या कार्यालयाचे लावले हे मला माहिती अधिकारात आजपर्यंत देण्यात आले नाही. कोणते कागदपत्र संबंधित वरिष्ठ कार्यालयाला दाखवून संस्था चालवली याचा देखील खुलासा समितीने करावा अशी मागणी आव्हाने यांनी केली. या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित संस्थेची परवानगी रद्द करावी जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी जो खेळ या संस्थाचालकाने चालवला आहे तो बंद होईल अशी विनंती आव्हाळे यांनी केली आहे.

उपसचिव दंडगव्हाळ सर यांनी उच्च स्तरीय चौकशी समितीची नेमणूक केली असून ही चौकशी निपक्षपणे होईल. तसेच उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई येथे जी बैठक याच संस्थेच्या चौकशी संदर्भात लावणार आहे, ती बैठक लावण्याची गरज पडणार नाही असा विश्वास आहे.

केतन आव्हाळे

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here