वैजापूरमध्ये 'स्वच्छ भारत' मोहिमेची ऐशीतैशी!

वैजापूर । दिपक बरकसे

वैजापूर शहरात (Vaijapur News) येण्यासाठी तुम्ही कुठल्याही मार्गाने या तुमचे स्वागत हे कचऱ्यांच्या ढिगारानेच होणार आहे. वैजापूर शहरात येण्यासाठी असलेल्या गंगापूर रोड, लाडगाव रोड व येवला रोड या तिन्ही रस्त्यावर शहराच्या सुरुवातीलाच कचऱ्याने तुमचे स्वागत होते.

वैजापूर शहरात एन्ट्री करतानाच वैजापूर शहराच्या झालेल्या अवस्थेची जाणिव होत आहे. यासोबतच दुर्गंधी व कचऱ्यामुळे वैजापूर शहराची प्रतिमा ही खराब झाली असून अस्वच्छतेच्या या सर्व बाबींमुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. याकडे मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

वैजापूर शहरात येताना लाडगाव रोड व म्हस्की रोड या दोन्ही रोडच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारा पडून आहे. याच परिसरात नगर पालिकेची ओपन जिम देखील आहे. जिथे व्यायाम करण्यासाठी नागरिक येतात. मात्र कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांची गैरसोय होते. (Vaijapur Nagarpalika)

हे वाचलं का? – धक्कादायक! पुण्यात डंपरने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडलं

तर येवला रोडने शहरात येताना नारंगी सारंगी धरणालगत देखील मोठ्या प्रमाणत कचऱ्याचे ढीग साचून आहेत. या भागात नेहमीच कचरा साचून आहे. इथे कचरा जाळला ही जातो ज्यामुळे या परिसरात असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्याची गैरसोय होते.

शहरात येण्यासाठी असलेली तिसरी एन्ट्री म्हणजे गंगापूर रोड. या रोडवरील पुलाजवळ मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग आहे. तर याच भागात नगर पालिकेचा स्वच्छ भारत असा फलक लावून येथे कचरा टाकू नये अशा आशयाचे फलक लावलेले आहे. याच फलक भोवती मोठ्या प्रमाणत कचरा टाकला जातो.

स्वच्छ शहराचे कचऱ्याने विद्रुपीकरण

स्वच्छ व सुंदर ओळख असलेल्या वैजापूर शहराचे गेल्या काही महिन्यात विद्रुपीकरण झाले. या बाबीला जबाबदार कोण? स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याची बाब या सर्व प्रकरणातून दिसून येत आहे.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीचे ताजे अपडेट मिळवण्यासाठी क्लीक करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here