चीनमध्ये पसरलेल्या 'ह्यूमन मेटान्यूमो'चा पहिला रुग्ण भारतात आढळला!

२०२० मध्ये जगभरात थैमान घातलेल्या करोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमो (HMPV) व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. या व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

अशात चीनमधील हा व्हायरस भारतातही पोहोचला आहे. या व्हायरसचा पहिला रुग्ण बंगळुरूमध्ये आढळला आहे. एका आठ महिन्यांच्या बाळाला ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसचा संसर्ग झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बंगळुरूत ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळून आला आहे. बाधीत एक आठ महिन्यांचं बाळ असल्याचं वृत्त आहे. खाजगी लॅबचा रिपोर्ट एचएमपीव्ही व्हायरस पॉझिटिव्ह आला आहे.

हे वाचलं का? – भ्रष्टाचार उघड करणं तरूण पत्रकाराच्या जीवावर बेतलं, सेप्टिक टँकमध्ये सापडला मृतदेह

काय आहे एचएमपीव्ही व्हायरस?

एचएमपीव्ही व्हायरसतीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा व्हायरस सर्वप्रथम नेदरलँड्‌समध्ये सन २००१ मध्ये आढळला होता. एचएमपीव्ही या सामान्य श्वसन विषाणूच्या संसर्गाचे सर्दी हे प्रमुख लक्षण आहे. श्वसनमार्गाचे विकार (आरएसव्ही) आणि फ्लूप्रमाणे हिवाळा तसेच उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा त्रास उद्धवतो.

महाराष्ट्रात अद्याप शिरकाव नाही

चीनमध्ये एचएमपीव्ही व्हायरसचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत असल्या; तरी राज्यामध्ये अशा कोणत्याही रुग्णाची नोंद अद्याप झालेली नाही. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

हे वाचलं का? – संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारचा मोठा निर्णय, वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात?

ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) विषाणूमुळे तीव्र श्वसन संसर्गाचा त्रास उद्भवतो. तो लक्षात घेता राज्यातील २०२३च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये या रुग्णसंख्येमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, खबरदारीचा भाग म्हणून सामान्यांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींचे पालन करावे, असे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत.

चीनहून आलेल्या एमएमपीव्ही अहवालाबाबत चिंतेचे कारण नाही. राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या समन्वयाने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here