जिल्ह्यातील सर्वच आमदार पालकमंत्री असणार; संजय शिरसाठ असं का म्हणाले?

जिल्ह्याचा मी पालकमंत्री नसुन आपन सर्वच आमदार पालकमंत्री असणार, असं विधान सामाजिक न्याय मंत्री व संभाजी नगर जिल्ह्याचे पालमंत्री संजय शिरसाठ यांनी केलं आहे. वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला ते नाशिक जिल्हा बॉर्डर नांदगाव रा.मा.२६ सिमेंट रस्त्याच्या काॅक्रीटीकरणाचे उद्घाटन रविवार (दि. १९) रोजी सकाळी अकरा वाजता तलवाडा येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते.

१२० कोटी ८९ लाख रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री व संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ, वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरणारे, कन्नडच्या आमदार संजनाताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्त्यामुळे भागाचा विकास होऊन वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे वाचलं का? – महायुतीचा वाद चव्हाट्यावर! रायगड, नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती

कार्यक्रमात आ. बोरणारे व संजनाताई जाधव यांनी पालकमंत्र्यांकडून भविष्यात तालुक्यासाठी अधिक निधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावर पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी आपल्या भाषणात म्हणाले, “मी फक्त पालकमंत्री नसून आपण सर्वच आमदार पालकमंत्री आहोत. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांवर सामूहिक जबाबदारीने काम करायला हवे. मी चाळीस वर्षांपासून पक्षाचे काम करत आहे; काम करण्यासाठी मंत्रीपदाची गरज नाही.” यावेळी तलवाडा गावच्या वतीने भागिनाथ मगर, राजेंद्र मगर व ग्रामस्थ यांनी पालकमंत्री यांचा सत्कार केला.

हे वाचलं का? – प्रजासत्ताक दिनी कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार? वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर…

तालुक्यातील कविटखेडा वळण या ठिकाणी बिबट्याच्या हल्यात मृत मुलाच्या पालकांना पंचविस लक्ष रुपये तसेच तलवाडा येथे बिबट्याच्या हल्यात जखमी मुलीच्या पालकास ८० हजाराची मदत वन विभागाने पालकमंत्र्याच्या हस्ते धनादेश दिला. या कार्यक्रमाला डॉ. राजीव डोंगरे, सफियाबादवाडीचे उपसरपंच अनिल भोसले, उपसरपंच नंदकिशोर जाधव, तलवाडा सरपंच पुनम मगर, लोणी खुर्दचे सरपंच राधाकृष्ण सोनवणे, तहसीलदार सुनील सावंत, उपविभागीय अधिकारी आरुण जर्‍हाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here