
वैजापूर । दिपक बरकसे
राज्य सरकारच्या वतीने श्री भगवान महावीर स्वामी निर्वाण महोत्सव समितीतर्फे आयोजित महावीर स्वामी जीवन चरित्रावर आधारित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत लासुर (ता. वैजापूर) येथील चाटे स्कूलची विद्यार्थिनी आराध्या पारस लोढा हीने माध्यमिक विभागात प्रथम क्रमांक पटकावत ४ लाख ४४ हजार ४४४ रूपयांचे रोख पारितोषिक मिळविले आहे.
रविवारी, दोन फेब्रुवारी रोजी राजभवन च्या ऐतिहासिक दरबार हॉल मध्ये आयोजित कार्यक्रमात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आराध्याचा पारितोषिक धनादेश व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. पा रितोषिक वितरण सोहळ्याला कौशल्या विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार चैनसुखजी संचेती, ललितजी गांधी, हितेशभाई मोता आदींची प्रमुख उपस्थिती होती.
महावीर स्वामींचे तत्वज्ञान व विचार हे सर्वकालीन प्रभावी असुन अहिंसा, अपरिग्रह, अस्तेय, अचौर्य अनेकांतवाद ही त्यांची तत्वे विश्वशांतीसाठी आज अत्यंत महत्वपूर्ण अशी आहेत असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.
मंत्री मंगलप्रभात लोढा व आमदार चैनसुख संचेती यांनी भगवान महावीरांच्या विचारांचे महत्व विशद केले. जैन महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी या स्पर्धेत राज्यभरातील दहा हजाराहून अधिक शाळा व १६ लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी झाल्याचे सांगुन आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक रक्कमांच्या पुरस्काराद्वारे विद्यार्थ्यांना गौरविण्यात आल्याचे सांगुन एकुण २५ लाख रूपयांचे पुरस्कार वितरीत केल्याची माहीती दिली.
हे वाचलं का? – धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचारासाठी १०० रुपयांची सुपारी, हत्येचा ही होता प्लॅन पण…; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
या राज्यव्यापी भव्य आयोजनाच्या यशस्वीतेसाठी निमंत्रित सदस्य संदिप भंडारी यांच्यासह शासकीय जिल्हा समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याचबरोबर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी यांचेही मोलाचे सहकार्य मिळाल्यामुळेच हे आयोजन यशस्वी झाल्याचे ललित गांधी यांनी सांगितले
सर्वाधिक विद्यार्थी सहभागी होण्यामध्ये नाशिक जिल्ह्याने प्रथम क्रमांक, कोल्हापूर जिल्हा द्वितीय क्रमांक व नागपूर जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकावला.
प्रथम क्रमांकाच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा व जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
प्राथमिक विभागातील राज्यातुन प्रथम आलेल्या गुंज निलेश सेठीया ३ लाख ३३ हजार ३३३ रूपये द्वितीय आलेल्या स्वास्ती जिनेश काला हिला २ लाख २२ हजार २२२ रूपये, तृतीय आलेल्या श्रीशा प्रसाद सोनवणे हीला १ लाख ११ हजार १११ रूपये तसेच माध्यमिक विभागातील राज्यातुन प्रथम आलेल्या वैजापूर तालुक्यातील चाटे स्कूल, लासुरच्या आराध्या पारस लोढा हिला ४ लाख ४४ हजार ४४४ रूपये, अक्षय एकनाथ ढेरे यास २ लाख २२ हजार २२२ रूपये, शर्वरी प्रज्ञान भोजनकर हिला १ लाख ११ हजार १११ रूपये पारितोषिक म्हणून प्रदान करण्यात आले. याव्यतिरीक्त १० विशिष्ट निबंध, ५ सर्वोत्तम शाळा यांचा राज्यपाल महोदयांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी जैन महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, आमदार चैनसुख संचेती, संदिप भंडारी यांच्या हस्ते संभाजीनगर जिल्हा समिती सदस्य निलेश पारख, कमलेश बागरेचा, रवींद्र लोढा, प्रकाश कोचेटा, महावीर पाटणी यांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. जिल्हास्तरावरील पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा पारीतोषिक वितरण समारंभ त्या त्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येणार असल्याची माहीती ललित गांधी यांनी दिली.
प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा



