कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाली. लोकांमध्ये मोठा संताप बघायला मिळाला.

या घटनेने संपूर्ण देश हादरला. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयला शनिवारी (१८ जानेवारी) कोर्टाने दोषी ठरवले होते. आज सोमवारी (२० जानेवारी) संजय रॉयला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच पीडीतेच्या कुटुंबियांना १७ लाख भरपाई देण्यात येणार होती. मात्र पीडितेच्या कुटुंबियांनी भरपाई घेण्यास नकार दिला आहे.

या प्रकरणात, सीबीआयने फॉरेन्सिक तपासणीद्वारे सिद्ध केले की पीडितेच्या नखाखाली सापडलेले नमुने संजय रॉयच्या डीएनएशी जुळतात. याशिवाय सीसीटीव्ही फुटेज आणि ब्लूटूथ हेडफोन्ससारखे पुरावेही न्यायालयात सादर करण्यात आले. यावरून हे सिद्ध झाले की संजय रॉय हा एकटाच या गुन्ह्यात सहभागी होता. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आरजी कर बलात्कार आणि खून प्रकरणात संजय रॉय हा एकमेव व्यक्ती असल्याचे निश्चित केले आणि अनेक गुन्हेगार असण्याची शक्यता नाकारली होती.

हे वाचलं का? – चिमुकल्या पुतणीसाठी ९ महिन्यांची गर्भवती बिबट्याला भिडली! वैजापूरच्या आधुनिक हिरकणी पल्लवीताईंची गोष्ट

दरम्यान आरजी कार बलात्कार हत्या प्रकरणात निकाल देऊन देखील कोर्टाबाहेर नागरीकांनी आंदोलन सूरूच ठेवलं आहे. खरं तर आंदोलकांनी या प्रकरणाक संजय रॉय सोबत अनेक आरोपी होती. त्यामुळे त्यांना देखील शिक्षा द्यावी,अशी मागणी आंदोलकांची आहे. या मागणीसाठीच निकालानंतर आंदोलक आंदोलन करत आहेत.

काय आहे प्रकरण ?

कोलकाता येथील आर. जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. ९ ऑगस्ट २०२४ ला ही घटना घडली होती. या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात आला. या घटनेवरुन देशभरातले डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं शनिवारी पाहण्यास मिळालं.

या घटनेतले नवे पैलू रोज समोर येत होते. तसंच आर. जी. कर महाविद्यालय आणि रुग्णालयातील ट्रेनी विद्यार्थ्यांनी सुमारे दीड महिना आंदोलन केलं होतं. कोलकाता बलात्कार प्रकरणातला मुख्य आरोपी संजय रॉय हा रुग्णालयातील डॉक्टरवर बलात्कार करण्याआधी आणि तिची हत्या करण्याआधी तो रेड लाइट एरियात गेला होता अशी माहिती समोर आली होती. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं होतं. सेलदाह कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here