Vaijapur Crime News: टवाळखोरांनी हद्दच केली! पंचायत समितीतील महिला कर्मचाऱ्याची छेडछाड; दोघांवर गुन्हा दाखल

वैजापूर पंचायत समिती कार्यालयातील (Vaijapur Panchayat Samiti) एका महिला कर्मचाऱ्याची वारंवार छेड काढणाऱ्या दोन जणांविरुद्ध मंगळवारी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये दत्तात्रय माधवराव मोटे (रा. गोयगाव) आणि सचिन कुशीनाथ मोईन (रा. चोरवाघलगाव) यांचा समावेश आहे. हे दोघेही सतत महिलेचा पाठलाग करत होते आणि तिचे फोटो काढून मानसिक त्रास देत होते. (woman employee harassment)

हे वाचलं का? – धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचारासाठी १०० रुपयांची सुपारी, हत्येचा ही होता प्लॅन पण…; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार

या दोघांनी पीडित महिलेला अनेक वेळा त्रास दिला. तिच्या सततच्या छेडछाडीमुळे अखेर तिने आपल्या सहकारी महिला कर्मचाऱ्यांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. मात्र, तरीही आरोपींनी आपले वर्तन सुरूच ठेवले. त्यांनी महिलेचे फोटो काढून, “तुला काय करायचे ते कर” अशी धमकी दिली. (photo harassment)

महिलेने अखेर वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, दत्तात्रय मोटे आणि सचिन मोईन यांच्यावर विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल (police case) करण्यात आला आहे.

हे वाचलं का? – अस्मानीसह सुलतानी संकट! तणनाशक फवारणीमुळं १०० एकरावरचा कांदा नष्ट, नाशिक जिल्ह्यातील प्रकार

या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार भगवान सिंगल करीत आहेत. या घटनेमुळे वैजापूरमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. (Crime news)

प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here