संतोष देशमुखांच्या हत्येत वाल्मिक कराडच मास्टर माईंड, सीआयडीने फास आवळला!

बीड । Beed

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणानंतर वातावरण तापल्याचे पाहिला मिळाले. संतोष देशमुख यांची हत्या होऊन अनेक दिवस उलटले आहेत. या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. तर इतर सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे.

दरम्यान, या हत्या प्रकरणात मोठी आणि खळबळजनक माहिती समोर आलेली आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड याचा दाखल आरोपपत्रात आरोपी क्रमांक एक म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे एक प्रकारे वाल्मिक कराडच या संपूर्ण हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचे आरोपपत्रातून मांडण्यात आलेले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून वाल्मीक कराड याचा उल्लेख आहे. आरोप पत्रामध्ये आरोपी नंबर दोन मध्ये विष्णू चाटे याचा उल्लेख आहे. त्यांनी आवादा कंपनीकडे खंडणी मागितली. त्यातून झालेल्या वादानंतर हत्या झाल्याचे देखील पुढे आले आहे. आवादा पवनचक्की प्रकल्पाच्या प्रोजेक्ट मॅनेजर सुनील केंदू शिंदे यांच्याकडे वाल्मीक कराड विष्णू चाटेच्या मोबाईल वरून फोन गेला आणि त्यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केली. 29 नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरून वाल्मीक कराडने खंडणी मागितली होती.

हे वाचलं का? – “संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा प्लॅन, महिलाही तयार होती, पण…”; भावाचा खळबळजनक खुलासा

६ डिसेंबर रोजी देशमुखांच्या गावामध्ये सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि सांगळेंशी आवादा पवनचक्की प्रकल्पावर वाद घडला. ५ गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराड विरुद्ध सबळ पुरावे मिळाले आहेत. खंडणी ॲट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीकडे आहे.

आरोपत्रातील आरोपींची क्रमवारी

  1. आरोपी क्रमांक एक- वाल्मीक कराड
  2. आरोपी क्रमांक दोन- विष्णू चाटे
  3. आरोपी क्रमांक तीन- सुदर्शन घुले
  4. आरोपी क्रमांक चार- प्रतीक घुले
  5. आरोपी क्रमांक पाच- सुधीर सांगळे
  6. आरोपी क्रमांक सहा- महेश केदार
  7. आरोपी क्रमांक सात- जयराम चाटे
  8. आरोपी क्रमांक आठ (फरार)- कृष्णा आंधळे

हे वाचलं का? – शिंदे-फडणवीसांमध्ये नाराजीचा नवा अंक? शिंदेंच्या आमदारांची Y दर्जाची सुरक्षा काढली, आता केवळ…

दरम्यान, या प्रकरणातून दोघांची नावे वगळण्यात आली आहेत. सिद्धार्थ सोनावणे आणि रणजित मुळे या दोघांना आरोपपत्रातून वगळलं आहे. त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे आढळले नसल्याने त्यांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आता सिद्धार्थ सोनावणे हा माफीचा साक्षीदार होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येला आता २ महिने झाले आहेत. हत्येप्रकरणी पोलीस, सीआयडी पथकं तपास करत आहेत. हत्या प्रकरणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले, आंदोलनं झाली. मात्र, देशमुख कुटुंब अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले, तरी मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आंधळे बेपत्ता झाल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here