धक्कादायक! घरात घुसून महिलेचा विनयभंग, शिवीगाळ करत चाकूने वार

वैजापूर । दिपक बरकसे

वैजापूर येथील एका महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयिताविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Vaijapur crime news)

संशयित आरोपी इस्माईल याकुब शेख (रा. जहागीरदार कॉलनी, येवला, जि. नाशिक) याने महिलेच्या घरी जबरदस्तीने प्रवेश करून तिच्या हाताला धरून लज्जास्पद कृत्य केले आणि विनयभंग केला (exual harassment case). महिलेला विरोध करताच संशयित आरोपीने चाकूने तिच्या डाव्या दंडावर व बोटावर वार केले. तसेच, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

हे वाचलं का? – धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचारासाठी १०० रुपयांची सुपारी, हत्येचा ही होता प्लॅन पण…; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार

या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली (oman assaulted in Vaijapur). त्यानुसार, एक फेब्रुवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Maharashtra crime news)

या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Vaijapur police news)

प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here