शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत - जी. एम. पाटील

वैजापूर । दिपक बरकसे

शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि सर्वांगीण विकास साधणारे विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्तेवर विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे शाळा निरीक्षक जी. एम. पाटील यांनी केले. वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील न्यू हायस्कूलला भेट देऊन त्यांनी शाळेच्या शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेतला.

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे निरीक्षक जी. एम. पाटील, ए. यू. साळुंखे, आर. एस. ठोंबरे आणि एन. आर. शिंदे यांनी शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील कामकाज आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेतला. जी. एम. पाटील यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मराठी माध्यमाच्या शाळांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांशी स्पर्धा करण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. वाचन आणि लेखन प्रकल्पांवर विशेष लक्ष देऊन विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करावा, असे त्यांनी सुचवले.

हे वाचलं का? – कोकण कड्यावर भयंकर घडलं! ४० वर्षीय तलाठ्याने तरुणीसह आयुष्य संपवलं; चिठ्ठीत बरचं काही लिहून ठेवलं, नेमकं काय घडलं?

पाटील यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, नवोदय आणि विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्याचे आवाहन केले. विशेषतः गणित आणि इंग्रजी विषयांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी लक्ष द्यावे, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून अध्यापन करावे आणि त्यांच्या खेळांकडेही लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे, फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

हे वाचलं का? – धक्कादायक! पतीने कोयत्याने वार करत पत्नीला संपवलं; रूममधील भिंतीवर उडाल्या रक्ताच्या चिळकांड्या, नेमकं काय घडलं?

यावेळी शाळेच्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या उत्कृष्ट निकालाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिस्त आणि एकूणच शैक्षणिक कामकाजाबाबतही निरीक्षकांनी कौतुक केले. तसेच, शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामाचाही आढावा घेण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक जे. बी. नारळे यांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला. यावेळी सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शाळेच्या प्रगतीसाठी शिक्षकांनी सातत्याने नावीन्यपूर्ण प्रयत्न करावेत, असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here