
वैजापूर । दीपक बरकसे
रमजान ईदच्या निमित्ताने सोमवार (ता. ३१) रोजी ईदगाह मैदानावर नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी आनंदाने आणि उत्साहात ईद साजरी केली. देशात शांतता, सुव्यवस्था, बंधुता नांदावी आणि सर्व नागरिकांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना अल्लाहकडे करण्यात आली. या पवित्र सोहळ्याला हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते.
ईदगाह मैदानावर सुमारे पाच ते सहा हजार मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा केली. संपूर्ण परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस प्रशासनाने दक्षता घेत गर्दीच्या व्यवस्थापनातही महत्त्वाची भूमिका बजावली.
या प्रसंगी तालुक्याचे आमदार प्रा. रमेश पाटील बोरनारे, माजी सभापती बाबासाहेब जगताप, डॉ. दिनेश परदेशी, डॉ. राजीव डोंगरे, डॉ. निलेश भाटिया, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, शहर प्रमुख पारस घाटे, प्रकाश चव्हाण, दशरथ बनकर, ठाकूर धोंडीरामसिंग राजपूत, विशाल संचेती, संजय बोरनारे, माजी नगरसेवक शैलेश चव्हाण, ऍड. प्रमोद जगताप, संजय निकम, दिनेश ढाकरे, मोहन साळुंके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रशासनाच्या वतीनेही अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हा (ग्रामीण) अतिरिक्त पोलीस प्रमुख अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, उपजिल्हाधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनिल सावंत, पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, गृह रक्षक अधिकारी नांगरे पाटील, ज्ञानेश्वर टेके माऊली, सचिन राऊत यांनी मुस्लिम समाजाच्या प्रमुख व्यक्तींना शुभेच्छा दिल्या.
सदर-ए-काझी हाफीजोद्दीन, माजी नगराध्यक्ष साबेरखान, मजीद कुरेशी, अकील शेख, कयूम सौदागर, अल्ताफ बाबा, ऍड. रियासतअली, ऍड. मझहर बेग, सलीम वैजापूरी, सज्जादअली, अहमद पठाण, रियाज राजू पठाण, साबेर पठाण यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या. ईदच्या निमित्ताने बाजारपेठांमध्येही मोठी गर्दी दिसून आली.
पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना केल्या होत्या. स. पो. नि. देशमुख आणि ज्ञानेश्वर मेटे यांनीही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष लक्ष दिले. कोणत्याही अनुचित प्रकाराला थारा न देता शांततेत हा सण साजरा करण्यासाठी प्रशासनाने उत्कृष्ट समन्वय साधला.
एकूणच, वैजापूरमध्ये रमजान ईद अत्यंत उत्साहात आणि सलोख्याच्या वातावरणात साजरी झाली. धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन सर्वांनी एकत्र येत सौहार्द आणि एकात्मतेचा संदेश दिला. यानिमित्ताने शहरात एक वेगळेच सकारात्मक आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले होते.


