अवैध वाळू उपशाकडे महसूलचे ‘अर्थपूर्ण दुर्लक्ष’,वैजापूर तालुक्यात बेसुमार उपसा | Photo Credit : Deepak Barkase, Canva, Edited

वैजापूर | दीपक बरकसे

वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव गंगा (Babulgaon Ganga) आणि पुरणगाव (Purangaon) शिवारांमध्ये दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा (Illegal sand mining) सुरू असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. महसूल विभाग कारवाईसाठी धनलक्ष्मीच्या प्रतीक्षेत असल्याची टीका स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. (Vaijapur sand mining)

पुरणगाव शिवारात जवळपास २५ ट्रॅक्टरच्या मदतीने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. ही कामगिरी दिवसाढवळ्या चालू असून वाळू माफिया (Sand mafia) पूर्णपणे बेधडकपणे कारभार करत असल्याचे दिसून येते. कायद्याचा व प्रशासनाचा कोणताही धाक या टोळक्यांना राहिलेला नाही. (Environmental damage)

हे वाचलं का? – वैजापूरात शेतकऱ्यांचा रुद्रावतार; बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडले

बाभुळगाव गंगा परिसरातील ‘बेवडा पॉईंट’ या ठिकाणीही १५ ते २० ट्रॅक्टरद्वारे वाळू उपसा सुरू आहे. रात्रीच्या वेळेस मिनी हायवा वाहनांद्वारे ही वाळू भरली जाते व बाहेर पाठवली जाते. स्थानिकांनी या प्रकाराकडे अनेकदा लक्ष वेधले आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. (Revenue department inaction)

या अवैध वाळू उपसामुळे नैसर्गिक संसाधनांचे मोठे नुकसान होत असून पर्यावरणाचा समतोलही बिघडतो आहे. महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांकडून यावर कठोर पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे अशा प्रश्नांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष कधी जाणार, हा प्रश्न नागरिक विचारत आहेत (environmental damage due to mining)

हे वाचलं का? – आधी कचरा, नंतर गटारी अन् आता पाणी गळती! वैजापूर नगरपालिकेच्या नाकर्तेपणाने शहरवासीय हैराण

या प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अवैध वाळू उपशामुळे (Illegal sand extraction) नदीपात्रांची खोली वाढते, जलस्तर कमी होतो आणि पाण्याचा उपसा अडचणीचा ठरतो. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे. (sand mining news)

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here