
वैजापूर । दिपक बरकसे
मागील अनेक वर्षांपासुन प्रतिक्षेत असलेल्या वैजापूर शहरातील शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन या अतिशय महत्त्वपुर्ण वैद्यकिय सेवेला सुरुवात झाली असुन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (९ फेब्रुवारी) त्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकापण करण्यात आले.
राज्यातील केवळ दोन ठिकाणी या सेवेला सुरुवात होत असुन वैजापुरचे आमदार रमेश पाटील बोरनारे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे यात गोंदियासह वैजापुरचा समावेश करण्यात आला आहे अशी माहिती यावेळी वैद्यकिय सुत्रांनी दिली.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे आमदार रमेश पाटील बोरनारे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, साबेर खान, बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव, आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. पी.एन. मोरे, डॉ. राजीव डोंगरे, डॉ. अभिजित अन्नदाते, माजी सभापती बाबासाहेब जगताप, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र साळुंके, डॉ. सुभाष भोपळे, डॉ. प्रशांत बढे, बाजार समितीचे संचालक गणेश इंगळे, प्रशांत त्रिभुवन, कल्याण जगताप, ज्ञानेश्वर घोडके, पारस घाटे, श्रीराम गायकवाड या मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी आमदार बोरनारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
हे वाचलं का? – प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं, अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने काढला काटा
राज्यस्तरीय सोहळ्यात आठ कर्करोग मोबाईल व्हॅन, सात ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट ॲम्ब्युलन्सेस, १०२ क्रमांकासाठी ३८७ रुग्णवाहिका, किमोथेरपी सेंटर, ८० डिजिटल हेड एक्स रे मशिन्स, दोन सीटी स्कॅन यंत्र आदी वैद्यकिय सेवांचे लोकार्पण होत असल्याची माहिती यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ वानेरे यांनी दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या झोकुन देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे राज्यातील माता मृत्युचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले असल्याचे निरीक्षण नोंदवत यापुढे सरकारी दवाखान्यातील औषधांची योग्य तपासणी केल्यानंतरच ते रुग्णांसाठी उपलब्ध केले जातील तसेच उपजिल्हा रुग्णालयात मोड्युलर ऑपरेशन थिएटर (ओटी) उपलब्ध असतांना सिझेरियन सेक्शनची कामे कमी का होतात यासह अन्य बाबींचा आढावा घेण्यात येईल, प्रत्येक ब्लॉकला स्वत़त्र बैठक घेण्यात येईल असे आश्वासन डॉ. वानेरे यांनी दिले.
खासगी ॲग्रीमेंट करुन सीटी स्कॅन ची सुविधा देणारी ही पहिली घटना असुन उपजिल्हा रुग्णालयातील काही डॉक्टरांचे डेप्युटेशन व डॉक्टरांना निवासस्थाने उपलब्ध करुन देण्यासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करु असे आश्वासन आमदार रमेश पाटील बोरनारे यांनी दिले. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनी येथील परिचारिका व वैद्यकिय अधिकाऱ्यांशी अरेरावी न करता सौजन्याने वागणुक ठेवुन वैद्यकिय सेवेचा लाभ घ्यावा असा सल्ला डॉ. दिनेश परदेशी यांनी दिला.
हे वाचलं का? – धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचारासाठी १०० रुपयांची सुपारी, हत्येचा ही होता प्लॅन पण…; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
डॉ. राजीव डोंगरे, डॉ. प्रशांत बढे, डॉ परिमल सावंत, विद्या महाडकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. किशोर वाघुले यांनी केले. डॉ. सुधाकर मुंढे, प्रशासकिय अधिकारी निकम, डॉ. कपिल देशमुख, डॉ. नितिन मोरे, शाम उचित यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
फोटो: वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन सेवेचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने आमदार रमेश पाटील बोरनारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


