वैजापूर ग्रामीण 1 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ज्योती गायकवाड, उपसरपंचपदी रवी गायकवाड बिनविरोध

वैजापूर । दीपक बरकसे

वैजापूर ग्रामीण 1 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ज्योती सचिन गायकवाड आणि उपसरपंचपदी रवी सुरेश गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. गावाच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी उत्साहाने काम करण्याचा निर्धार या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांनी व्यक्त केला आहे. या निवडीमुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

निवड प्रक्रियेदरम्यान गावातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यामध्ये माजी सरपंच दौलत गायकवाड, माजी नगरसेवक सुभाष गायकवाड, युवासेना तालुका प्रमुख श्रीराम गायकवाड, बाजार समितीचे संचालक बद्री आण्णा गायकवाड, प्रवीण गायकवाड, माजी उपसरपंच शिवा आण्णा पेहरकर, शैलेश निखाडे, राजू गायकवाड, दत्ता गायकवाड आणि उदय गायकवाड यांचा समावेश होता. या सर्वांनी नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंचांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ज्योती गायकवाड आणि रवी गायकवाड यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. “आम्ही गावकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरू. शिक्षण, पायाभूत सुविधा आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू,” असे ज्योती गायकवाड यांनी सांगितले. तर रवी गायकवाड यांनी, “गावातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग आणि सहकार्य आम्हाला विकासाच्या मार्गावर पुढे नेईल,” असे मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here