बँकेसमोर उभ्या कारमधून सोन्याच्या दागिन्यांसह बॅग पळवली | Photo - Canva

वैजापूर | दीपक बरकसे

वैजापूर (Vaijapur car theft) शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या लोकविकास बँकेसमोर (Lokvikas Bank) उभी असलेली कार फोडून चोरट्यांनी सुमारे आठ ते नऊ ग्रॅम वजनाचे दागिने असलेली बॅग चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (4 मे) दुपारी चारच्या सुमारास घडली असून त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

संदीप साळुंके हे चांडगाव (ता. वैजापूर) येथील रहिवासी असून त्यांच्या पत्नी आपल्या भावाला भेटण्यासाठी वाघलगाव येथे गेल्या होत्या. तेथून परत येताना त्या आणि त्यांचा भाऊ सासरी जाण्यासाठी कारने वैजापूर शहरात आले. शहरातील लोकविकास बँकेसमोर त्यांनी मारुती 800 (MH 06 T 1712) ही कार उभी केली आणि शेजारीच असलेल्या एका चप्पल दुकानात खरेदीसाठी गेले. (gold stolen from car)

हे वाचलं का? –  चोरट्यांचा धुडगूस! शेतकऱ्याची विहिरीतील मोटार चोरली, ४०० फूट पाईप जाळला

मात्र केवळ काही मिनिटांत दुकानातून परत आल्यानंतर त्यांनी कारची तपासणी केली असता, कारमध्ये ठेवलेले कपडे व त्यात असलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बॅगमध्ये सुमारे आठ ते नऊ ग्रॅम वजनाचे दागिने असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी सुदर्शन मोईन (रा. वाघलगाव, ता. वैजापूर) यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान सिंघल यांच्याकडे या घटनेचा तपास सोपवण्यात आला आहे. (Vaijapur crime news)

हे वाचलं का? – वैजापूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; घरफोडी करत स्कूटी, टीव्ही लंपास

वैजापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून वाहनातून चोरीच्या घटना सातत्याने घडत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी उभ्या केलेल्या वाहनांमध्ये मौल्यवान वस्तू न ठेवण्याचा सल्ला पोलिसांकडून वेळोवेळी देण्यात येतो. मात्र तरीही अशा घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

ताज्या बातम्यांचे अपडेट्स थेट आपल्या फोनवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलला लगेच जॉइन करा! येथे क्लिक करा.

Get the latest Marathi newsMaharashtra news, and updates from politicselectionsportsentertainmenthealthagriculturebusiness, and religion – only on headlinesmarathi.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here