
वैजापूर | दीपक बरकसे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shiv Sena UBT) पक्षाने राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफी व महिलांना जाहीर करण्यात आलेले २१०० रुपयांचे लाभ अद्यापही न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर तीव्र आंदोलन छेडले. ‘सरकार क्या हुआ तेरा वादा?’ या घोषणेतून सरकारला दिलेल्या वचनांची आठवण करून देण्यासाठी राज्यभरात हे आंदोलन करण्यात येत आहे. (Vaijapur Shiv Sena UBT protest)
या आंदोलनाचा भाग म्हणून वैजापुरात बुधवारी दुपारी १२ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून जोरदार मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निर्देशानुसार शिवसैनिकांनी या मोर्चात सहभाग घेत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “सरकार क्या हुआ तेरा वादा?”, “शेतकऱ्यांची कर्जमाफी कुठे गेली?”, “लाडक्या बहिणींचे २१०० रुपये कधी?” अशा प्रश्नांमधून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. (Maharashtra farm loan waiver 2025)
हे वाचलं का? – हनीमूनचं रूपांतर हत्याकांडात! राजा रघुवंशी हत्या प्रकरणी ट्विस्ट, नव्या नवरीनेच दिली पतीची सुपारी
यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून, सरकारने निवडणुकीपूर्वी केलेली आश्वासने तात्काळ पूर्ण करावीत (Maharashtra government broken promises), अशी जोरदार मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गप्प राहणाऱ्या सरकारचा खरपूस समाचार घेत शिवसैनिकांनी आंदोलनात आक्रमक भूमिका घेतली. (2100 rupees scheme for women)
या आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख सचिन वाणी, विधानसभा संघटक मनाजी मिसाळ, शहरप्रमुख प्रकाश चव्हाण, तालुका संघटक मनोज गायके, युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल डमाळे, उपजिल्हाप्रमुख अनिल न्हावले, अक्षय साठे, उपतालुकाप्रमुख अँड. रमेश सावंत यांच्यासह नंदकिशोर जाधव, कडुतात्या सोनवणे, बाळासाहेब बडक, अण्णा पवार, राहुल साळुंखे, संकेत वाणी, उपशहरप्रमुख शिवाजी जाधव, रवींद्र पगारे, मनोज त्रिभुवन, शौकत शाह, विलास धने, उज्वल कदम, राजू नवले, चंद्रभान हजारे, भगवान शिंदे, दिगंबर वाघचौरे, सिराज शेख, गब्बू पठाण, काकासाहेब मिसाळ, बाजीराव पवार, सुनील ठोंबरे, बापू ठोंबरे, गणेश शिंदे, गणेश पवार, गोकुळ वाघ, लक्ष्मण सोळसे, अशोक दाजीबा पगारे, बाळासाहेब मिसाळ, उबेद इनामदार, अमजद शेख, कपिल पगारे, नामदेव त्रिभुवन, सोमनाथ त्रिभुवन, सुरेश आलुले, शेख अकील शेख गफार, सतीश बागुल, शेख इरफान, आवेज खान यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Shiv Sena agitation news)
हे वाचलं का? – मागील भांडणाच्या कारणावरून जीवघेणा हल्ला; बंदुकीचा धाक दाखवत ७ तोळे सोने, २ लाख लुटले
हे आंदोलन फक्त सरकारला जागं करण्यासाठी नसून, जनतेच्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी आहे, असा इशारा उपस्थित कार्यकर्त्यांनी दिला. सरकारने लवकरच योग्य पावलं उचलली नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. (Headlines Marathi)
Shiv Sena (UBT) Protests in Vaijapur Over Unfulfilled Farm Loan Waiver and Women’s Scheme Promises
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


