
वैजापूर । दिपक बरकसे
सराला बेटावर गुरुपोर्णिमा व व्यासपूजा उत्सवाची जय्यत तयारीश्री क्षेत्र सराला बेट (Sarala Bet Guru Purnima 2025) येथे गुरुपोर्णिमा आणि व्यासपूजा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
सदगुरु गंगागिरी महाराज आणि ब्रह्मलीन सदगुरु नारायण गिरी महाराज यांच्या समाधीस्थळासह संपूर्ण गोदाधाम बेट रंगीबेरंगी विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने नटले आहे. या उत्सवाच्या तयारीसाठी जोरदार काम सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपोर्णिमेनिमित्त अहिल्या नगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदगाव, येवला, मनमाड, संगमनेर येथून लाखो भाविक या सोहळ्यासाठी हजेरी लावणार आहेत.
गुरुवार, १० जुलै रोजी सकाळी १० वाजता गोदाधाम बेटाचे मठाधिपती गुरुवर्य महंत रामगिरी महाराज (Mahant Ramgiri Maharaj) यांच्या अमृतवाणीतून भाविकांना मार्गदर्शन होणार आहे. या वेळी भक्तीमय वातावरणात लाखो भाविक गुरुमंत्राद्वारे गुरुदिक्षा स्वीकारतील. ही परंपरा गेल्या १५० वर्षांहून अधिक काळापासून अखंडपणे सुरू आहे. या उत्सवात भाविक आपल्या गुरूंचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतात. (Vyaspurjan 2025 celebrations)
या सोहळ्याला पश्चिम महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. माजी आमदार कैलास पाटील चिकटगावकर यांनी २५ वर्षांपूर्वी सुरू केलेली परंपरा आजही अव्याहतपणे सुरू आहे. यंदाही माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, अभय पाटील चिकटगावकर, आमदार प्रा. रमेश पाटील बोरनारे, माजी नगराध्यक्ष तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिनेशभाऊ परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेरखान, माजी उपनगराध्यक्ष अकिल सेठ, माजी सभापती बाबासाहेब जगताप, काळू पाटील वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर गुरुवर्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गोदाधाम बेटावर येणार आहेत. (Headlines Marathi)
या उत्सवाचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा, असे आवाहन बेटाचे विश्वस्त ह.भ.प. मधुकर महाराज यांनी केले आहे. हा सोहळा भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जेचा आणि गुरुभक्तीचा अनमोल क्षण ठरणार आहे. (Maharashtra Guru Purnima events)
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


