
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. जय पवार यांच्या विवाहाची अधिकृत घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली असून, त्यांच्या साखरपुड्याची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. (Ajit Pawar son marriage)
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा 10 एप्रिल रोजी पुण्यात पार पडणार आहे. हा सोहळा पार पडण्याआधी गुरुवारी रात्री दोघांनी आपल्या कुटुंबासह शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी शरद पवार यांच्यासह त्यांची पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. (Jay Pawar engagement)

जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी ऋतुजा पाटील या प्रसिद्ध सोशल मीडिया कंपनीचे मालक प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत. त्या उच्चशिक्षित असून, त्यांची बहीण प्रसिद्ध पर्यटन कंपनी ‘केसरी ट्रॅव्हल्स’च्या घराण्यात सून म्हणून गेली आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांची अनेक वर्षांपासून ओळख असून, अखेर ते विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. (Rutuja Patil biography)
जय पवार हे राजकारणापासून दूर असले तरी, विधानसभा निवडणुकीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अजित पवार यांनी बारामती मतदारसंघ सोडून अन्य मतदारसंघातून लढण्याचे संकेत दिले होते. त्यावेळी जय पवार हे बारामतीतून निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. विधानसभा निवडणुकीच्या काळात अजित पवार संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार करत होते, तेव्हा बारामती मतदारसंघातील प्रचाराची जबाबदारी जय पवार यांनी सांभाळली होती. यामुळे त्यांच्या राजकारणात सक्रीय होण्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. त्याआधी जय पवार दुबईमध्ये व्यवसाय सांभाळत होते. (Pawar family wedding)

विधानसभा निवडणुकीनंतर आता पवार कुटुंबामध्ये मोठ्या उत्साहात विवाहसोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक राजकीय घडामोडी सुरू असतानाच हा विवाहसोहळा कुटुंबासाठी आनंदाचा क्षण घेऊन आला आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या विवाह सोहळ्यासाठी कोणत्या खास व्यक्ती उपस्थित राहणार, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, हा विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडेल, अशी अपेक्षा आहे.
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या भावी आयुष्यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या असून, सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


