
गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेले रशिया-युक्रेन युद्ध काही शांत होताना दिसत नाहीत. दिवसेंदिवस याला वेगळे वळण लागतंय. नुकतेच युक्रेन सैन्याने पुन्हा एकदा रशियाच्या कुस्के क्षेत्राला निशाणा बनवत येथे हल्ला चढवला.
अमेरिकन निर्मित HIMATS ड्रोनने हा हल्ला चढवल्याची माहिती रशियाने दिली आहे. युक्रेनने रशियावर 9/11 सारखा भीषण हल्ला केलाय. कजान शहरातील बहुमजली इमारतीवर हा ड्रोन हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात इमारतीला भीषण आग लागली आहे. कजान शहरातील बहुमजली इमारतीवर ड्रोन हल्ला झाल्यानंतर रशियन नागरिक हादरले आहेत. या हल्ल्ल्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असे रशियाकडून सांगण्यात आले आहे.
युक्रेन लष्कराने पुन्हा एकदा रशियाच्या कुर्स्क भागाला लक्ष्य केले आहे. युक्रेनियन सैन्याने शुक्रवारी कुर्स्क प्रदेशातील रिल्स्कवर क्षेपणास्त्र हल्ला केला, ज्यात एका मुलासह सहा जण ठार झाले आणि दहा जण जखमी झाले आहेत. असे प्रदेशाचे कार्यवाह गव्हर्नर अलेक्झांडर खिन्श्तेन यांनी याबाबत माहिती दिली. हा हल्ला अमेरिकन बनावटीच्या HIMARS क्षेपणास्त्रांनी करण्यात आल्याचे रशियन अधिकाऱ्याने सांगितले. या हल्ल्यामुळे शहरातील अनेक इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, ज्यात एक कल्चर हाऊस, एक प्राथमिक शाळा आणि रिल्स्क एव्हिएशन कॉलेज आणि रिसर्च क्वार्टर यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली.



