दुर्दैवी! तरुणाने अचानक घेतला टोकाचा निर्णय, कुटुंबाचा मन हेलावणारा आक्रोश

वैजापूर । दिपक बरकसे

तालुक्यातील लाख खंडाळा शिवारात एका २० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (४ फेब्रुवारी) सायंकाळी उघडकीस आली. सुनील काशिनाथ पवार (वय २०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुनील याने लाख खंडाळा शिवारात गळफास घेऊन जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी त्याला तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी सुमारे ६:३० वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती परिवाराला कळताच रुग्णालयातच कुटुंबाने मोठा आक्रोश केला.

हे वाचलं का? – प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं, अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने काढला काटा

याबाबत माहिती मिळताच उपनिरीक्षक नलावडे आणि पोलीस कर्मचारी विशाल पडळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची नोंद वैजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here