
आजपासून भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) बँकींग सिस्टीममध्ये बँकींग सिस्टीममध्ये नवीन बदल करण्याची घोषणा केली आहे. त्याचा परिणाम कोट्यवधी लोकांवर पडू शकतो. रिझर्व्ह बँकेचा हा नवीन नियम बँक खात्यांवर लागू होणार आहे. त्यामुळे तीन प्रकारची बँक खाती बंद होणार आहेत.
ज्या बँक खात्यात गेल्या १२ महिन्यात कोणताही व्यवहार झालेला नाही, म्हणजे बँक खात्यात १२ महिन्यांपासून जी खाती बंद आहेत ती बँक खाती बंद केली जाणार आहेत. तसेच ज्या बँक खात्यात खूप काळापासून शून्य बॅलन्स आहेत त्या खात्यांना देखील आजपासून बंद करण्यात येणार आहे. (RBI’s big decision)
Agriculture News : गहू, ज्वारी आणि हरभऱ्याचे दर कडाडणार?
अशा खात्यांचा दुरुपयोग टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर ज्या दोन किंवा अधिक वर्षांपासून कोणतेही ट्राझक्शन झालेले नाही. अशी खाती सायबर गु्न्हेगारांच्या निशाण्यावर असतात. अशी खाती हॅक केली जातात. आणि त्याचा वापर लोकांची फसवणूक करण्यासाठी केला जातो. त्यामुळे अशी खरे देखील बंद करण्यात येणार आहे.
आरबीआयने फसवणूकीच्या प्रकारांना रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. बँकींग क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी, डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सायबर गुन्हेगारीचा धोका कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान तुम्हाला हवे तर नंतर बँकेशी संपर्क करुन आपले खाते पुन्हा एक्टीव्ह करु शकता.



