
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठा विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी अनेक दिग्गजांची नावे चर्चेत होती. अखेर भाजप विधिमंडळ गटाच्या बैठकीत रेखा गुप्ता (Rekha Gupta Delhi CM) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी प्रवेश वर्मा, विजेंद्र गुप्ता, सतीश उपाध्याय, पवन शर्मा, आशिष सूद, शिखा राय, रवींद्र इंद्रराज सिंह आणि कैलाश गंगवाल यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, भाजपने दिल्लीत नवा पॅटर्न राबवत रेखा गुप्ता यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. विशेष म्हणजे, दिल्लीत उपमुख्यमंत्री असणार नाही. (Delhi BJP leader)
रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. याआधी शीला दीक्षित (काँग्रेस), सुषमा स्वराज (भाजप) आणि आतिषी (आप) यांनी ही जबाबदारी सांभाळली होती. रेखा गुप्ता या देशातील दुसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत.
हे वाचलं का? – शिंदे-फडणवीसांमध्ये नाराजीचा नवा अंक? शिंदेंच्या आमदारांची Y दर्जाची सुरक्षा काढली, आता केवळ…
रेखा गुप्ता गुरुवारी दुपारी रामलीला मैदानात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यास भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.
निवडणुकीत रेखा गुप्ता यांनी आपच्या बंदना कुमारी यांना २९,५९५ मतांनी पराभूत केले. रेखा गुप्ता यांना ६८,२०० मते मिळाली, तर बंदना कुमारी यांना ३८,६०५ मते मिळाली. काँग्रेसच्या प्रवीण जैन यांना केवळ ४,८९२ मते मिळाली. (Rekha Gupta Shalimar Bagh)
सध्या दिल्ली भाजपच्या सरचिटणीस आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा असलेल्या रेखा गुप्ता यांनी १९९५-९६ मध्ये दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती. त्यांचा जन्म १९७४ मध्ये हरियाणातील जिंद जिल्ह्यातील नंदगड गावात झाला. (Rekha Gupta biography)
हे वाचलं का? – …याचाच अर्थ धनंजय मुंडे कराडला वाचवत आहेत, राजीनामा द्याच; नरेंद्र पाटील यांचा घरचा आहेर
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, रेखा गुप्ता यांच्याकडे ५.३ कोटींची मालमत्ता असून त्यांच्यावर १.२ कोटींचे कर्ज आहे. त्यांच्याकडे १.४८ लाख रुपयांची रोकड असून बँक खात्यात ७२.९४ रुपये जमा आहेत. त्यांची विविध कंपन्यांमध्ये शेअर गुंतवणूक आहे आणि एलआयसीमध्ये ५३ लाख रुपयांची गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे.
भाजपच्या या निर्णयामुळे दिल्लीच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला असून, रेखा गुप्ता यांची कामगिरी कशी राहील, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


