कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर; एकमेकांना थेट पेडा भरविला... वैजापूरच्या राजकारणात जोरदार चर्चा

वैजापूर । दिपक बरकसे

काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात कट्टर विरोधक ठरलेले आमदार रमेश बोरनारे (Ramesh Boranare) आणि माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी (Dinesh Pardeshi) हे दोन्ही नेते एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर आले.

आश्चर्याची बाब म्हणजे, त्यांनी एकमेकांना थेट पेडा भरविला आणि ‘राजकारण फक्त निवडणुकीपुरतेच मर्यादित आहे’ असा संदेश दिला. या घटनेने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, हा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (Vaijapur Politics)

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप रंगले होते. परंतु, निवडणुकीतील वाद बाजूला ठेवत ते विकासाच्या दृष्टीने एकत्र येत असल्याचे पाहून अनेकांना आनंद झाला आहे. (Political Rivals)

हे वाचलं का? – काय सांगता! गुन्हेगारांनी केले पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण, ४ तासांच्या थरारानंतर सुटका…

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोकांमध्ये राजकीय नेत्यांच्या या बदलत्या समीकरणांबद्दल उलटसुलट चर्चा रंगली असून, काहींना हा राजकीय खेळ वाटत आहे तर काहींना यामध्ये विकासासाठी एकत्र येण्याची सकारात्मकता दिसत आहे.

आता खरा प्रश्न हा आहे की, हे सौहार्दपूर्ण वातावरण किती काळ टिकते? आगामी राजकीय घडामोडी यात किती बदल घडवतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (Political Reconciliation)

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here