
केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण अद्याप ताजे असून बीड जिल्ह्यांत तणावग्रस्त परिस्थिती आहे. अशातच परळी तालुक्यातून आणखी एका धक्कादायक घटनेची माहिती समोर आली आहे.
परळी तालुक्यात मिरवड फाट्यावर शनिवारी रात्री औष्णिक केंद्राची राख वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस्वार सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांना उडवल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला. सौंदाना गावाचे सरपंच असलेल्या अभिमन्यू क्षीरसागर यांच्या या अपघाती मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
परळीत महानिर्मितीचे औष्णिक वीज केंद्र आहे. या औष्णिक वीज केंद्रातून दररोज राख निर्मिती होते. या राखेची अधिकृत आणि अनधिकृत वाहतूक होत असते. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर हा भीषण अपघात झाला.
हे वाचलं का? – भरधाव पिकअपने शाळकरी मुलीला उडविले, मुलीचा जागीच मृत्यू… घटना CCTV मध्ये कैद
ही धडक एवढी जोरात होती की या अपघातात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीचा चुराडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघात प्रकरणी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
अभिमन्यू क्षीरसागर यांच्या मृत्यूनंतर हा अपघात होता की घातपात, याबाबत परिसरात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून राखेच्या वाहतुकीबाबत उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कायदा व सुव्यवस्थेवर आधीच प्रश्न उपस्थित झाले असताना या नव्या घटनेने प्रशासनावर आणखी दबाव निर्माण झाला आहे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी क्लीक करा


