नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत १८ जणांनी गमावला जीव

सध्या देशात सगळ्यांचेच लक्ष प्रयागराजमधील कुंभमेळ्याकडे (Kumbh Mela 2025) लागले आहे. १४४ वर्षांनी आलेल्या या कुंभमेळ्यासाठी जगभरातून अनेक भाविक हजेरी लावत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक पवित्र स्नान करण्यासाठी प्रयागराजला पोहोचत आहेत. (New Delhi Railway Station stampede)

याचदरम्यान नवी दिल्ली येथे एक दुर्देवी घटना घडली आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये ९ महिला, ४ पुरुष आणि ५ मुलांचा समावेश आहे. मृतांमधील ९ जण बिहारमधील, ८ दिल्लीतील आणि एक हरियाणातील आहेत. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या अनेकांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. चेंगराचेंगरीची घटना घडण्यापूर्वी आणि नंतरचे मन हेलावून टाकणारे व्हिडीओ समोर आले आहेत. (train station tragedy)

नवी दिल्ली रेल्वे स्थानकातून कुंभमेळ्यासाठी दोन विशेष ट्रेन चालवल्या जात होत्या. शनिवारीनंतर रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने शेकडो लोक कुंभस्नानासाठी प्रयागराजला निघाले होते. स्थानकावर प्रचंड गर्दी झाल्याने प्लॅटफॉर्मपासून जिन्यांपर्यंत प्रवाशांचा मोठा जमाव जमला होता. रात्री साधारण नऊ वाजण्याच्या दरम्यान प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर १५ वर पोहोचली आणि प्रवाशांची एकच धावपळ सुरू झाली. याच धावपळीत पायऱ्यांवर उभे असलेले लोक खाली पडले आणि मोठी चेंगराचेंगरी झाली. (stampede deaths India)

हे वाचलं का? – प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं, अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने काढला काटा

चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळताच पोलिस आणि फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये चेंगराचेंगरीनंतरची भयावह दृश्ये दिसत आहेत. पायऱ्यांवर प्रवाशांचे कपडे, बुटं-चप्पल विखुरलेले दिसत आहेत आणि अनेकजण बेशुद्ध पडलेले आहेत.

भारतीय वायूसेनेतील सार्जंट अजित यांनी सांगितले की, “मी ड्यूटीवरून परत येत होतो, पण गर्दीमुळे कार्यालयात पोहोचू शकलो नाही. मी लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलं, पण कुणीही ऐकलं नाही. मी आणि माझ्या मित्राने जखमींना मदत केली.” (Kumbh Mela rush)

हे वाचलं का? – काय सांगता! गुन्हेगारांनी केले पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण, ४ तासांच्या थरारानंतर सुटका…

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. दिल्ली पोलीस आणि आरपीएफ घटनास्थळी तैनात आहेत. जखमींवर तातडीने उपचार सुरू आहेत.” सरकारने मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना २.५ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. (Indian railway safety)

दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि अनेक विरोधी नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. सरकारकडून अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (railway crowd control)

ही दुर्घटना प्रशासनासाठी एक मोठा धडा आहे. (railway crowd control) भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने गर्दी नियमन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या उपाययोजना अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. (latest India news)

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here