
सध्या महागाईने उच्चांक गाठला असून, सर्वसामान्य जनतेला महागाईचा फटका बसत आहे. इंधन दरवाढ, भाजीपाला आणि फळांच्या किंमतीतील वाढ यामुळे आधीच आर्थिक ताण वाढला आहे. त्यात आता दुधाच्या दरातही वाढ होणार असल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. (milk price hike)
गेल्या काही दिवसांपासून दूध उत्पादक संघाकडून गायीच्या आणि म्हशीच्या दुधाच्या किंमतीत वाढ करण्याचा विचार सुरू होता. (rising milk prices) अखेर हा निर्णय घेण्यात आला असून, गायीच्या आणि म्हशीच्या दुधाच्या किंमतीत प्रत्येकी २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गायीच्या दुधाचा दर ५६ रुपयांवरून ५८ रुपये प्रति लिटर तर म्हशीच्या दुधाचा दर ७२ रुपयांवरून ७४ रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज डेअरी) येथे बुधवारी (१२ मार्च) दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते दुधाच्या दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे मानद सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले की, वाढीव दर उद्या म्हणजेच १५ मार्चपासून लागू करण्यात येणार आहेत. (dairy inflation)
हे वाचलं का? – आता आरोग्य तपासणीसाठी हॉस्पिटलला जाण्याची गरज नाही, घरबसल्या चाचण्या करा!
दुधाच्या दरात वाढ करण्यामागील मुख्य कारण म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळावा, हा आहे. सध्या महागाईमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना चारा, वाहतूक आणि प्रक्रिया यांसाठी अधिक खर्च करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा दरवाढीचा निर्णय घेतल्याचे कुतवळ यांनी स्पष्ट केले. (cow milk rate)
महागाईने आधीच सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यात आता दुधाच्या दरवाढीमुळे दुधावर आधारित पदार्थ आणि दुग्धजन्य उत्पादनांचे दरही वाढण्याची शक्यता आहे. यामुळे चहा, कॉफी, मिठाई, तूप, दही आणि पनीर यासारख्या पदार्थांच्या किंमतीतही वाढ होऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्यांना अधिक खर्च करावा लागणार आहे. (buffalo milk cost)
हे वाचलं का? – उपविभागीय कार्यालयाच्या दारातच तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; वैजापूरातील धक्कादायक घटना
दुधाच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक भार वाढला असला तरी अद्याप सरकारकडून कोणतीही मदत किंवा अनुदान जाहीर करण्यात आलेले नाही. सरकारने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ग्राहक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. (Katraj Dairy price update)
महागाईच्या वाढत्या झळांमध्ये दुधाच्या दरवाढीने सामान्य जनतेच्या अडचणी वाढल्या आहेत. १५ मार्चपासून नवीन दर लागू होणार असून, याचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावर होणार आहे. सरकारने यावर काही उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


