पुढील काही तास महत्त्वाचे! राज्यातील हवामान बदलांनी चिंता वाढवली

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. किमान तापमान वाढण्यास सुरूवात झाली होती पण आता पुन्हा किमान तापमानात घट होऊ लागली आहे. (Maharashtra Weather Update)

राज्यात पुन्हा थंडी पसरली आहे. गारठा वाढल्यामुळे नागरिक पुन्हा गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत. राज्यातील किमान तापमानातील वाढ सध्या कायम आहे. २४ जानेवारीपासून किमान तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गारठा कमी झाल्यामुळे उकाडा जाणवू लागला होता. राज्यातील किमान तापमानाचा पारा १० वरून थेट १५ ते २३ अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये तापमानात वाढ झाली आहे.

हे वाचलं का? – १ रुपयांत पीक विमा योजनेत गैरप्रकार, योजना खरंच बंद होणार?; काय म्हणाले राज्याचे कृषीमंत्री?

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ होत असली तरीही पुढील २४ तासांमध्ये त्यात आणखी घट अपेक्षित असल्याचा इशारा देण्यात आला आहे. सातत्यानं सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं राज्यात पुन्हा एकदा थंडी काहीशी सक्रिय होताना दिसत आहे.

असं असलं तरीही तापमानातील चढ- उतार मात्र कायम असल्याचं पाहायला मिळतंय. पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रामध्येही धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. तर, विदर्भात काही अंशी पहाटेच्या वेळी बोचरी थंडी जाणवत आहे.

हे वाचलं का? – कांदा उत्पादकांवर नवे संकट! बांगलादेशकडून आयातीवर दहा टक्के शुल्क

वातावरणात (Atmosphere) सतत बदल होत आहेत. कधी थंडीचा कडाका वाढतो तर काही वेळेला ढगाळ वातावरणामुळे तापमानात (Temperature) अचानक वाढ होते. अशा वातावरणामुळे सध्या आजारांचे (Illnesses) प्रमाण देखील वाढले आहे.

वाढणारी थंडी ही रब्बी पिकांना पोषक असून, शेतकऱ्यांना (Farmers) मोठा दिलासा मिळणार आहे. जर राज्यात थंडीचा कडाका वाढला तर रब्बी हंगामातील (Rabi Season) पिकांची वाढ अधिक जोमाने होण्यास मदत होणार आहे.

तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here