
महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत नवी माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार या संदर्भातील माहिती दिली आहे.
लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून, वाढीव रकमेबाबत येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेतला जाणार आहे. जानेवारीचा हप्ता हा १५०० रुपयांचा असणार आहे. दरम्यान येत्या आठ ते दहा दिवसांत लाडक्या बहिणींना या महिन्याचा हप्ता मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. या महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता २६ जानेवारीच्या आसपास दिला जाणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे.
हे वाचलं का? – अपात्र बहिणींचे ‘लाड’ संपणार! ‘हे’ निकष पाळले नाहीत तर ७५०० रुपये परत घेणार
या महिन्याच्या हप्त्यातही लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले जाणार असल्याचं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. नवीन अर्थसंकल्प किंवा पुढच्या काळात २१०० रुपये देण्याचा प्रयत्न असेल असं त्यांनी सांगितलं आहे. विरोधकांनी यावर नेहमीच टीका केली आहे, जे वचन आम्ही दिलं आहे ते पूर्ण करू असं त्या म्हणाल्या आहेत. महिन्याला ३६९० कोटींची तरतूद केली आहे. फेब्रुवारीची तरतूदही करतोय. खंड न पडता द्यायचा प्रयत्न करत आहोत असं त्यांनी सांगितलं आहे.
काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दुबार योजनांचा लाभ घेतलेले यातून कमी होतील. तक्रारी, तपासणी यातून आकडा कमी होईल. मागील महिन्यांच्या तुलनेत एखादा टक्का कमी होईल. एक दोन लाख संख्या कमी होईल, असं त्या म्हणाल्या आहेत.
हे वाचलं का? – घसघशीत ‘रिटर्न्स’ मोहात लाखो गुंतवले, आता पश्चात्तापाची वेळ! आयुष्यभराची जमापुंजी गेली
‘त्या’ लाडक्या बहिणी अपात्र ठरणार
याआधी अदिती तटकरे यांनी कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली तर, तिच्या अर्जाची छाननी करून छाननी करण्यात येईल. त्यानुसार निकषबाह्य अर्ज भरलेले अर्ज अपात्र केले जातील असं सांगितलं होतं. तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जा छाननी करणार नाही. उत्पन्नात वाढ झाली असेल, अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेलं असेल तर त्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत; चारचाकी असलेल्या महिला अपात्र ठरतील; आंतरराज्य विवाह केलेल्या महिला या योजनेस पात्र नाहीत; आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळं असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास ती संबंधित महिला अपात्र ठरेल, असं आदिती तटकरे म्हणाल्या.
तुमच्या भागातील प्रत्येक घडामोडीची ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला ॲड व्हा


